देश-विदेश

अखेर आजोबा मेले, मी खूप खूश आहे….

घरात कोणाचे निधन झाले तर संपूर्ण घर दु:खात खाईत लोटले जाते. त्या परिस्थितीत घराच्या माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही. मात्र या सोशल मिडीयाच्या जमान्यात युवा पिढी काय करेल सांगता येत नाही. अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराला जाण्याआधी चक्क मेकअप करत व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत मुलगी जे बोलतेय ते ऐकून आजोबा गेल्याचा हिला दु:ख झालंय की आनंद झालाय असा प्रश्न युजर्सना पडलाय.

आजोबा गेल्याचं दु:ख की आनंद
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगी मेकअप करताना दिसत आहे. मेक अप करताना ती म्हणतेय ‘आता मी स्मशानभूमीत चालले आहे, Thank You Guys तुम्ही सर्वांनी माझ्या आजोबांसाठी प्रार्थना केली. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. अखेर आजोबा मेले, मी खूप खूश आहे. ते जिवंत असते तर त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागल्या असत्या. आत मी त्यांच्या अंतिम संस्कारासाठी जात आहे. स्मशानभूमीत जात असल्याने मी जास्त मेक अप करत नाहीए. थोडासाच मेक अप करेन म्हणजे एकदम लाईट. मला लाईट मेकअपच आवडतो. भडक मेकअफ मला आवडत नाही. डीजेतही नाचायचं आहे. म्हणून जास्त श्रृंगार करत नाहीए, नाहीतर नाचता येणार नाही. माझ्या आजोबांना गजरा खूप आवडायचा. त्यामुळे मी विचार केला की अंतिम संस्कारात केसात गजरा माळून जावं. मी पहिल्यांदाच केसात गजरा माळला आहे. मी कशी दिसतेय, प्लीज कमेंट करुन सांगा आणि माझ्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा, नरकात गेल्यावरही ते आनंदी राहोत आणि यापुढे आमच्यापासून दूर राहोत, Ok Guys आता मी निघतेय, तुम्ही सबस्क्राईब करा, byee guys, राधे राधे’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button