क्राइम

आधी पतीसोबत दारू पार्टी, मग गळा दाबून केली हत्या

ग्वालियर : पत्नीने पतीला दारु पाजली, त्याला मासे फ्राय करुन खायला दिले आणि नंतर पतीचा गळा दाबून त्याची हत्या केली.

ही घटना ग्वालियरमधील आहे. मृताचे नाव लोकेंद्र असे असून अंत्यसंस्कारावेळी आलेल्या काही लोकांना लोकेंद्र यांच्या गळ्यावर काही खरचटलेले डाग दिसले. ते पाहून लोकांना संशय आला आणि याबाबत पोलिसांत माहिती देण्यात आली. लोकेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार थांबण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात लोकेंद्र यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. अंजलीने नातेवाईकांना लोकेंद्रने काही खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र गळ्यावरील निशाण पाहून संशय आला आणि तिचा गुन्हा समोर आला.

अंजलीचे तिचा प्रियकर गौरवसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती अंजलीच्या पतीला लोकेंद्रला मिळाली होती. त्यानंतर लोकेंद्रने गौरव याला त्यांच्या घरी येण्यास मनाई केली होती. त्यामुळेच अंजलीने गौरव आणि तिच्या मावस भावासोबत हत्येचा कट रचला. त्याआधी गौरववर हत्येचा संशय येऊ नये यासाठी हत्येच्या १५ दिवस आधी गौरवला नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर पाठवण्यात आलं होतं.

१८ सप्टेंबरच्या रात्री अंजलीने तिच्या मावस भावाला घरी बोलावलं. अंजलीने लोकेंद्रला दारू पाजली. नंतर मच्छी खायला घातली. तो नशेत असल्याचं समजल्यानंतर तिच्या मावस भावाने लोकेंद्रचे हात पकडले आणि अंजलीने त्याच्या छातीवर बसून त्याची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंजली, तिचा भाऊ बेटू याच्यासह अंजलीच्या प्रियकराला गौरवला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button