विचित्र अपघात! कारच्या धडकेनंतर हवेत उडून तरणी फ्लायओव्हरच्या मधोमध खांबावर अडकली

नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली. यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. अखेर तरुणीची सुटका करण्यात यश आलं आहे. सध्या उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टिम्सनी तरुणीची सुखरुप सुटका केली. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं,’ अशी माहिती एडीसीपी मनीष कुमार मिश्रा यांनी दिली.
#WATCH | Uttar Pradesh: The scooty-riding girl who landed on the pillar base of the elevated road near Noida Sector 25, after she was hit by an unidentified vehicle, has now been rescued. The two men who were attempting to rescue her have also been rescued. All three of them have… pic.twitter.com/ZpEOwWSHE9
— ANI (@ANI) September 21, 2024
अज्ञात वाहनानं धडक दिल्यानंतर तरुणी पुलावरुन खाली पडली. दोन पुलांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेतून ती खाली पडली. सुदैवानं ती जिथून पडली, त्याखाली पुलाचा पिलर होता. तरुणी या पुलावर पडल्यानं पुढील अनर्थ टळला. यावेळी पुलावरुन जाणारे अनेक जण तिच्या मदतीला धावले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तिची सुटका केली.
तरुणीच्या दुचाकीला एका वॅगनआर कारनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांकडून या कारचा शोध सुरु आहे. या अपघाताबद्दल दुचाकीस्वार तरुणीला काही प्रश्न विचारु. तिची चौकशी करु. तिनं दिलेल्या माहितीवरुन, उत्तरांवरुन पुढील कारवाई करु, अशी माहिती एडीसीपी मनिष कुमार मिश्रांनी एएनआयला दिली.