कामगारांना दलालांच्या दावणीला बांधू नका, कार्यालय दलाल मुक्त करा
रिपब्लिकन कामगार सेनेचा कामगार उप आयुक्त चंद्रकांत राऊत यांना आंदोलनाचा इशारा
छ. संभाजीनगर दि.२३ कामगार आयुक्त कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून गोरगरीब कष्टकरी कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून ती तात्काळ थांबवून कार्यालय दलाल मुक्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन निकम यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने कामगार उप आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी भेट घेऊन देण्यात आला.
कामगार उप आयुक्त कार्यालयात साधा कामगार नोंदणीचा अर्ज देखील दलालांच्या मध्यस्थी शिवाय भरला जात नाही, गोरगरीब कष्टकरी कामगारांची मोठी आर्थीक लूट दलालांनी चालवली आहे राजरोस पणे हा प्रकार घडत असताना त्यावर कार्यालयाचा अंकुश राहिलेला नसल्याने त्याला कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा खुला पाठींबा आहे काय ? असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाने कामगारांच्या हितासाठी दिलेले साहित्य हे राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी याना राजकीय व आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी शिबिरे आयोजित करूनच दिली जात असल्याने त्यात भ्रष्टाचार होत आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
कामगारांना राजकीय लोकांच्या दावणीला बांधून त्यांच्या मागे फिरविण्याच्या आपल्या धोरणाचा शिष्टमंडळाने आक्रमक होत निषेध केला.
कष्टकऱ्यांच्या जीवावर अनेक लोक गब्बर होताना दिसत आहेत परंतु केवळ लाभाची वस्तू म्हणून कामगारांकडे पाहिले जात असल्याने या विरोधात रिपब्लिकन कामगार सेनेने जनआंदोलन उभे करणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष सचिन निकम यांनी सांगितले.
यावेळी नेते चंद्रकांत रुपेकर, जिल्हाध्यक्ष धम्मपाल भुजबळ, प्रा.सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, अस्कर खान, मनीषा साळुंखे, राहुल कानडे, विकास हिवराळे, शकील शेख, गुलाब जाधव, असजद शेख,दिपक जाधव, दिनेश गवळे, शैलेंद्र म्हस्के, मुजाहिद शेख, शेख समी, सय्यद फयाज, मजीद पठाण, नासिर खान, इलियास कुरेशी, सुषमा कुंभार, वर्षा खंडागळे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.