ग्लॅमरस अभिनेत्री लढवणार रासपकडून निवडणूक, महादेव जानकरांच्या उपस्थित प्रवेश

मुंबई : काही दिवसांपूर्वीच महायुतीला धक्का देत महादेव जानकरांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्याचबरोबर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं जानकरांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी आपल्या पक्षात मातब्बर, निवडणुक लढण्यास सक्षम अशा नेत्यांची भरणा करणे चालू केले आहे. आता महादेव जानकरांच्या पक्षात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
अभिनेत्री महक चौधरी हिनं महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला आहे. नुकताच तिचा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला. त राष्ट्रीय समाज पक्षाची मुंबई अध्यक्षा म्हणूनही महेक काम पाहणार आहे.
महक चौधरी ही आता रासपच्या तिकीटावर निवडणूक लढणार असल्याचंही म्हटलं जात आहे. महकनं एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिनं काही निवडणूक लढण्याबद्दलचे संकेत दिले आहेत.आगामी निवडणुकीत वर्सोवा मतदार संघातून ती निवडणूक लढणार असल्याचं तिनं यात म्हटलंय.
गीता कुमारी सिंह उर्फ महक चौधरी, मला सांगायला आनंद होतोय की राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वर्सोवा मतदार संघातून मला तिकीट देण्यात आलं आहे. आजपर्यंत तुम्ही मला नेहमीच पाठिंबा दिलाय, यापुढंही असाच पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा करते…असं महेक चौधरी हिनं म्हटलं आहे.
महक चौधरी ही मूळची उत्तर प्रदेशची असली तरी तिनं साऊथ इंडस्ट्रीतून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. २०१५मध्ये तिचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता. साऊथमध्ये काम केल्यानंतर महकनं बॉलिवूडमध्येही का केलंय. तसंच तिचे अनेक म्युझिक अल्बमही लोकप्रिय आहेत. तर ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.