सासरच्यांकडून महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ; नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) – पोलीस कर्मचारी असलेल्या विवाहितेला टी.बी.असल्याने सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तू घरात आल्यापासून आमचे काहीच चांगले झाले नाही. आधीच तू रोगीट आहेस, तू तुझ्या नोकरीच्या पगारातून आणि आई-वडिलांकडून पाच लाख घेऊन ये तरच आम्ही तुला नांदवू, असे म्हणून मानसिक आणि शारीरिक छळ करून तू पोलीस खात्यात नोकरी कशी करते तुला बघून घेतो अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडित विवाहितेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली, त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या ६ जणांवर भा.न्या.सं. (बी.एन.एस.२०२३) कलम ३ (५), ३५१ (२), ३५२, ८५ अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सासरच्यांना टी.बी. असल्याचे आधी माहित असून सुद्धा आम्हाला काही अडचण नाही, असे म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला दोन महिने चांगले नांदवले आणि नंतर तुला ‘टी.बी.’ चा आजार आहे असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित विवाहिता (नाव-गाव गोपनीय) हि तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील आहे, फिर्यादी ह्या २०१९ मध्ये पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. सध्या त्या रेल्वे पोलीस वसाहत घाटकोपर, पूर्व मुंबई येथे राहत असून वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. फिर्यादीला लग्नाच्या अगोदर सतत ताप येत असल्याने दवाखान्यात उपचार घेत असताना डॉक्टरांनी ‘टी.बी.’ असल्याचे सांगितले. हि गोष्ट फिर्यादींनी सासरच्यांना सांगितली, त्या नंतर त्यांनी सगळी माहिती घेऊन आम्हाला काही अडचण नाही असे म्हणून लग्नाला तयार झाले. त्या नंतर दोन महिने चांगले नांदविले नंतर तुला ‘टी.बी.’ चा आजार आहे असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. पतीने आई-वडिलांना फोन करून तुमच्या मुलीला टी.बी.’ आजार झालाय तुम्ही हिला घेऊन जा, हि खूप खोकते आम्ही हिला नांदवणार नाही. असे म्हणून शारीरिक मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. आणि याचा फायदा सासरा सूर्यकांत हे घेत ते पोलीस वसाहतीत दारू पिऊन यायचे फिर्यादीकडून पैसे घ्यायचे आणि म्हणायचे कि, तु एवढी भारी दिसतेस तू काजू बदाम खातेस का? तुझा नवरा तुझ्याकडे झोपायला येत नसेल तर मी येतो असे दुहेरी अर्थाने बोलून हसायचे त्या नंतर पतीने सुद्धा सोन्याचे दागिने घेऊन जात असताना चारित्र्यावर संशय घेऊन तू पोलीस खात्यात कशी नोकरी करते तेच बघतो, तुझ्या नोकरीच्या ठिकाणी येऊन तुझी बदनामी करून नोकरी घालवतो अशी धमकी दिली.
तरी (दि.३ जून २०२४) पासुन ते आजपावेतो माझे सासरी व नोकरीच्या ठिकाणी मुंबई येथे मला माझे सासरचे लोक १) पती – सचिन सुर्यकांत भाजीपाले,२) सासू – लक्ष्मीबाई सुर्यकांत भाजीपाले, ३) सासरा – सुर्यकांत मोतीराम भाजीपाले, ४) दीर – मारोती सुर्यकांत भाजीपाले, ५) दीर – योगेश सुर्यकांत भाजीपाले, सर्व रा.मुंडेवाडी ता.कंधार, जि.नांदेड, ह.मु. क्रश उत्कर्ष चाळ कमिटी ४ चाळ रोड, रमाबाई कॉलनी, घाटकोपर पूर्व मुंबई,आणि ६) चुलत सासरा – सुभाष मोतीराम भाजीपाले, रा.गुजोटी ता.उमरगा, जि.धाराशिव यांनी संगनमत करून तुला टी.बी.चा आजार आहे, तुला आम्ही नांदवत नाही. तु आमच्या घरात आल्यापासून आमचे चांगले झाले नाही तु आम्हास शोभत नाहीस योग्य नाहीस असे म्हणुन मला सतत शिवीगाळ करुन तुला घरातील स्वयंपाक येत नाही असे म्हणून मला नेहमीच घरात टोचून घालून पाडून बोलून, तु तुझ्या नोकरीच्या पगारातुन व तुझे आई वडीलांकडून पाच लाख रूपये घेवून ये तरच तुला नांदवू असे म्हणून मला नेहमीच शिवीगाळ करून मानसिक व शारीरीक छळ करून तु पोलीस खात्यात नोकरी कशी काय करते तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या ६ जणांवर भा.न्या.सं. (बी.एन. एस.२०२३) कलम ३(५), ३५१(२),३५२, ८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.