इतरमहाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाचे थैमान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाचा जोर वाढला असून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. मराठवाड्यात पावसाचा तांडव सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. याठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हवामानशास्त्र विभागानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात विक्रमी पाऊस झालाय. रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात तुफान पाऊस होत असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेलाच आहे. धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरण भरलं आहे.

हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, मागील ६ तासांत अरबी समुद्रावर असणारा कमी दाबाचा पट्टा आता नैऋत्येकडे सरकला आहे. त्यामुळं विदर्भासह मराठवाड्यावर पुढील १२ तास कमी दाब राहणार असून आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून छत्रपती संभाजीनगरला पावसाला ऑरेंज अलर्ट दिलाय. यावेळी वादळी वाऱ्यांसह व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button