राज कुंद्राच्या अश्लिल चित्रपटातील हिरोईनला अटक

भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रिया उर्फ आरोही बर्डे ही मुळची बांगलादेशची असून तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याचा आरोप आहे. यासाठी रियाच्या आईने अमरावती इथल्या एका व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.
रिया उर्फ आरोही बर्डेचं खरं नाव बन्ना शेख असं आहे ती मूळची बांगलादेशची आहे. उल्हासनगरमध्ये ती आई, बहिण आणि भावासोबत बेकायदेशीरपणे राहात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिया अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रोडक्शनशी संबंधीत होती, तिने अनेक अश्लील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रियाला यापूर्वी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रियाच्या आईने पश्चिम बंगालची रहिवाशी असल्याचं सांग अमरावती इथल्या अरविंद बर्डे या व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर तीने स्वत:ची आणि मुलांची बनावट जन्मपत्र आणि इतर कागदपत्र सादर करुन भारतीय पासपोर्ट तयार केला. पण रियाची आई रुबी शेख हि मुळची बांगलादेशची असल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे.
अशी मिळाली पोलिसांना माहिती
वास्तविक रिया उर्फ आरोही बर्डेच्या एका मित्राने पोलिसांना रियाबाबताची माहिती दिली. रिया ही भारतीय नसून बांगलादेशी असल्याचं त्यांना पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी रियाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली असती ती बनावट असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी रियावर अटकेची कारवाई केली. रियाच्या भाऊ आणि बहिणीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधीही मुंबई पोलिसांनी रियाला वेश्या व्यवसायाप्रकरणी अटक केली होती.