
हिंदीतील प्रख्यात कवि अन् राम कथा वाचक कुमार विश्वास यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी भगवान रामाचे गुणगान बंद करावे अन्यथा त्यांना आम्ही ठार करू, असे त्यांच्या व्यवस्थापकाच्या मोबाइलवर फोन करून धमकावण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कुमार विश्वास गाझियाबादच्या वसुंधरा या भागात राहतात. सध्ये ते सिंगापूर येथे असून धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. स्वत: कुमार विश्वास यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यांचे मॅनेजर प्रविण पांडे म्हणाले की ज्या प्रकारची धमकी देण्यात आली त्यावरून डॉ. विश्वास आणि माझ्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार धमकीचा कॉल मुंबई येथून आला होता. कोणत्या ॲपवरून हा कॉल केलेला नव्हता तर नॉर्मल कॉल होता आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कॉल कोणी केला आणि त्याचा उद्देश काय आहे याचा शोध सुरू असून लवकरच त्यात यश मिळेल असे पोलिसांनी म्हटले आहे.
कुमार विश्वास अत्यंत लोकप्रिय असून देश विदेशात त्यांचे कार्यक्रम होत असतात आणि हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमांना गर्दी होत असते. त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या विरोधात बोलणे सुरू केले आहे.