
मुंबई : मुंबईच्या येथे पार्किंगच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली. तसेच “कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन.” अशी गंभीर धमकी दिली आहे. हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला.
महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती. काही वेळानंतर तरुणाने डॉक्टरकडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली. त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले. त्यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली, ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.
या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली. यावेळी तरुणाने धमकी दिली की, “कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन.” या धमकीने महिला डॉक्टर अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी लगेचच मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.