खऱ्या बापाचा असेल तर सांगा, डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला? आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील फुटीमुळे दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहे. नाशिकमधील सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी जातीपातीचं राजकारण कोण करतंय असे म्हणत शरद पवारांना लक्ष्य केलं. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
धनंजय मुंडेंच्या या आरोपावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी खूप काही बोलू शकतो, त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, डॉ. बियानीचा मर्डर कोणी केला? त्याच्यामागचं कारण काय होतं. हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचं उत्तर देईल. नाही तर आमच्या एक भगिनी आहेत करुणा मुंडे नावाच्या, त्यांना बाजूला मी घेऊन बसतो आणि त्यांना सांगायला लावतो. जो खुद सिशोके घरो मे रहते हे, ओ दुसरो के घरो पे पत्थर नही मारा करते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय.
एकदा शरद पवार साहेबांनी सांगितलं ना की, तुझी किती लफडी होती आणि कसं बाहेर काढलं टीव्हीसमोर बसून सांगितलेलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच सर्वात जास्त नुकसान केलं, घर फोडलं म्हणता, मग हे शरद पवार साहेबांना जाऊन एकदा विचारा. साहेब जर असं सांगत असतील तर मी बोलतो हो, मी तसं केलं. धनंजय मुंडेने कशाला सांगायला हवं, हे एकदा शरद पवार साहेबांच्या तोंडून येऊ द्या ना, धनंजय मुंडे कोण? असे पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर केला. तसेच, धनंजय मुंडे शरद पवारांवर काय बोलणार, शरद पवारांनी फक्त ‘आ’ केलं तर घरात जाऊन बसेल. पण आमचे साहेब बोलत नाहीत ना, तोच आमचा प्रॉब्लेम आहे, साहेब कधीच कोणाबद्दल बोलू इच्छित नाहीत, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.
हा अजित पावरांचाच भाऊ, काकांच्या पाठीत सुरा खुपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा, आता गोडवे गातायेत पूर्वी काय केलं ते मला विचारा मी सांगतो. मी फक्त एवढेच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे, मी जो प्रश्न केला तो उभ्या महाराष्ट्राने त्याला करावा की, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला, असेही आव्हाड यांनी म्हटले.