महाराष्ट्रराजकारण

इम्तियाज जलील आमदारकी आणि खासदारकीसाठी नशीब अजमावणार

नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आमदारकी आणि खासदारकीसाठी नशीब अजमावणार आहे. ते नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची घोषणा केली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता.

जलील म्हणाले, आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. आम्हाला बी टीम म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.

नांदेड लोकसभेत काॅंग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत झाली होती. यामध्ये काँग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. विजय मिळवल्यानंतर खासदार वसंत चव्हाण यांचे तीन महिन्यानंतर निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button