पोलीस कवायत मैदानाच्या नुतणीकरणाचे पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण येथील पोलीस मुख्यालय लगत असलेल्या गोकुळ पोलीस कवायत मैदानाचे जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातुन नुतनीकरण करण्यात आले आहे. याकामाचे २८ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन करुन त्यांचे लोकापर्ण करण्यात आले आहे. या समारंभ प्रसंगी राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. कल्याण काळे, आ. प्रदीप जैस्वाल, पोलीस आयुक्त प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची उपस्थिती होती.
जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून गोकुळ पोलीस कवायत मैदानाचे सपाटीकरण (लेव्हलींग), निवारा शेड, भुमीगत सिमेंट कॉक्रीट नालीबांधकाम व लोखंडी जाळी बसविणे, सॅल्यूटींग बेस बांधकाम व सुशोभीकरण याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे शासकीय निवास्थानांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
याप्रसंगी प्रस्ताविक करतांना पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले कि, गोकुळ मैदान हे बरेच जुने असल्याने त्याचे सपाटीकरण व्यवस्थित नसल्याने याठिकाणी पावसळयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मैदानाला छोटया तळयाचे स्वरूप प्राप्त होत. यामुळे मैदान कोरडे होण्यासाठी बराच कालावधी लागत होता. ज्यामुळे पोलिसांचे मैदानावरिल प्रशिक्षण तसेच कवायत यांचे गैरसोय होत होती. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमांतुन निधी प्राप्त झाल्याने कवायत मैदानाचे सपाटीकरण करून पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसचे दोन मोठे शेड बनविण्यात आल्याने कार्यक्रम होण्यासाठी याची विशेष मदत होणार आहे. याच प्रमाणे गंगापुर व वैजापुर येथे सी.सी.टी.व्ही. सव्हिलन्स यंत्रणा कार्यन्वित करण्यात आल्याने त्यामुळे गुन्हेगाराचे शोध घेणे सोपे होवुन घटनाची अचुक माहिती उपलब्ध होईल. ज्यामुळे पोलीसांच्या कामात गती मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पोलीसाच्या या समस्यांची दखल घेवुन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले कि, पोलिसांना अद्यावत साधन सामग्री उपलब्ध करून देणे तसेच समस्या सोडवण्यासाठी निधीची कधीही कमतरता पडु देणार नाही. पोलीस रात्रदिवस रस्त्यावर असतात त्यामुळे सामान्य माणुस हा निवांत झोपु शकतो. त्यामुळे पोलीसांचे बळकटीकरण करणे अत्यावश्यक आहे. पोलीस शिपाई हा पोलीस विभागाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या समस्याचे बारकाईने निराकरण अत्यावश्यक आहे. त्याचे करिता सुविधा युक्त निवासस्थाने, जुने झालेले पोलीस ठाण्याचे ईमारतीच्या ठिकाणी अद्यावत व सुसज्ज अशी पोलीस ठाणे तयार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे याकरिता विशेष लक्ष देणार असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचेशी सुध्दा याविषयावर सखोल चर्चा करून प्रश्न मार्गी लाण्यावर भर देणार असल्याचे नमुद केले.