हिसार : देशातील सर्वात श्रीमंत महिला असून भाजपासह सर्वच पक्षानी त्यांना उमेदवारी नाकारली. त्याच महिलाने हरियाणातील हिसार जिल्ह्यातून दणदणीत विजय मिळवला. सावित्री जिंदाल असे त्या महिलेचे नाव आहे. हिसार येथे काँग्रेसचे रामनिवास राडा दुसऱ्या आणि भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भारताच्या निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस उमेदवार राम निवास रारा यांचा पराभव करत हिस्सार विधानसभेचं मैदान मारलं.
आभार हिसार परिवार 🙏 pic.twitter.com/92mr7GtDxJ
— Savitri Jindal (@SavitriJindal) October 8, 2024
अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना जिंदाल यांना ४९,२३१ मते मिळाली आणि रारावर विजय मिळवला ज्यांना ३०२९० माते मिळाली. उद्योगपती आणि कुरुक्षेत्रातील भारतीय जनता पार्टी (भाजप) चे खासदार नवीन जिंदल यांची आई सावित्री जिंदल यांनी यापूर्वी २००५ ते २०१४ पर्यंत हिसारचे प्रतिनिधित्व केले होते. सावित्री यांच्यापूर्वी त्यांचे दिवंगत पती ओपी जिंदाल या मतदार संघातून तीन वेळा निवडून आले होते.
देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून प्रख्यात सावित्री जिंदाल वयाच्या ८४ व्या वर्षीय कौटुंबिक जिंदल समूहाची जबाबदारी हाताळत आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी सावित्री जिंदल यांनी अनेक वर्षांनंतर काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ओपी जिंदल समूहाच्या अध्यक्षा आणि हरियाणाच्या माजी मंत्री सावित्री जिंदल यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केली होती पण, तिकीट न मिळाल्यामुळे या श्रीमंत महिलेने बंड पुकारले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपल्या निर्णयाबाबत सावित्री जिंदल म्हणाल्या की ही त्यांची शेवटची निवडणूक असून त्यांना जनतेची सेवा करायची आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सावित्री जिंदल यांनी विधानसभेत हिसार मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून त्यांनी हरियाणाच्या मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २००५ मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत पती आणि जिंदल समूहाचे संस्थापक ओपी जिंदल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदल यांनी यशस्वीपणे विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर २००९ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या तर २०१३ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते पण २०१४ विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.