दिराच्या प्रेमात पडलेल्या विवाहितेने आपल्या नवऱ्याला सोडून दिरासोबत पलायन केले. काही दिवस दिल्लीत सोबत राहिले. नंतर मन भरलेल्या दिराने ितला धोका देवून िदल्लीतच सोडून पलायन केले. याप्रकारानंतर भांबावलेल्या विवाहिताने नवराचा दरवाजा ठोठावला. पण नवऱ्याने तिला घरात घेण्यास नकार दिला. आता ती नवऱ्याने घरात घ्यावे, यासाठी आंदोलनास बसली आहे. सदर घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमधील आहे.
पत्नीने दिरासाठी पतीला सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर दीर आणि वहिनी पळून गेली. मात्र नंतर दिराने वहिनीशी संबंध तोडले. आता ना नवरा महिलेला सोबत ठेवायला तयार आहे ना दीर. यामुळे आता महिला तिच्या मुलासह पतीच्या घरासमोर ठाण मांडून बसली आहे. तिने आंदोलनाचे शस्त्र पुकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालाबादचे आहे. याठिकाणी किरण देवी गेल्या ७ दिवसांपासून सरपंचाच्या घराबाहेर ठाण मांडून आहेत. सरपंचाचा मुलगा मनीष हा त्याचा दीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दोघांचे गेल्या पाच वर्षांपासून अफेअर होते. दोघेही गुप्तपणे भेटत राहिले. महिनाभरापूर्वी ती पतीला सोडून प्रियकर दिरासोबत दिल्लीला पळून गेली होती. तिथल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केलं. मात्र महिनाभरानंतर दीर तेथूनही फरार झाला.
या प्रकरणी किरण देवी म्हणाल्या की, मी मूळची जमालाबादची आहे. सहा वर्षांपूर्वी माझा विवाह प्रमोद दास यांच्याशी झाला होता. मनीष नात्याने माझा दीर लागतो. तो मला फोन करायचा. मलाही त्याच्याशी बोलायला आवडायचं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते आम्हाला कळलंही नाही. माझ्या मुलाचाही जन्म झाला. दुसरीकडे मनीष आणि माझ्यातलं प्रेमही वाढतच गेलं. तेव्हा मनीषने मला सांगितले की, आपण दोघांनी येथून पळून दिल्लीला जावे. त्याच्या बोलण्याने मीही प्रभावित झाली, असं तिने सांगितले.
मी मनीषला अनेकदा फोन केला, पण त्याने उत्तर दिले नाही. मी दिल्लीत कोणाला ओळखतही नव्हते. अशा परिस्थितीत काही लोकांनी मला मदत केली. त्यांनी माझे ट्रेनचे तिकीट काढले आणि मला ट्रेनमध्ये बसवले. तेव्हाच मी घरी पोहोचली. मी माझ्या पतीकडे गेल्यावर त्यांनीही मला सोबत ठेवण्यास नकार दिला. मी मनीषच्या सरपंच वडिलांना माझा त्रास सांगितला तेव्हा त्यांनीही मला घरात येऊ दिले नाही. अशा परिस्थितीत मी आणि माझ्या मुलाने कुठे जावे हेच समजत नाही. मला मनीषसोबत राहायचे आहे.
तिने पुढे सांगितले की, महिनाभरापूर्वी आम्ही दिल्लीला पळून आलो. मनीष तेथे मजूर म्हणून काम करायचा. पण महिनाभरातच त्याने माझी अशी फसवणूक का केली हे कळत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझा निष्पाप मुलगा आणि मी एकटे पडलो आहोत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.