विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ

धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे (दि.७ ऑक्टोबर) रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते सलगरा येथील सिमेंट-काँक्रिट च्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी ‘भाजपा’ चे संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, सरपंच विष्णू वाघमारे (माळी), उपसरपंच प्रशांत (काका) लोमटे, जीवन लोमटे, सिव्हिल इंजिनिअर अर्जुन वाघमारे (माळी), तात्या केदार, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर बोधणे, नवनाथ माळी, प्रशांत बोधणे, अभिमान मोरे, दिलीप मुळे, अभिजित लोमटे, देवानंद माळी, तोहीद पटेल, चंद्रकांत माळी, विनायक गुंजकर, बालाजी माळी, अझर मुलाणी, गोपीचंद माळी, भास्कर मुळे, नागनाथ बंडगर, शंकर माळी, मुस्तफा मुलाणी, प्रशांत माळी, बालाजी राजगुरू, सहदेव माळी यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.