
नवी दिल्ली : संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत (चर्चासत्र सुरु आहे. कालच्या चर्चासत्रात खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकार जोरदार हल्ला चढवला होता. आज झालेल्या चर्चासत्रात आज राहुल गांधी यांनीही सहभाग घेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी यावेळी ५० टक्के आरक्षण मर्यादा आणि जातीय जणगणना आम्ही लागू करून दाखवू, तुम्हाला जे करायचे आहे ते करून दाखवा, असा इशारा दिला आहे.
यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. ते म्हणाले की,”जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला, तसं तुम्ही देशाच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानी आणि अंबानींना दिले जात आहेत. भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतकऱ्यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जात आहे, पेपर लीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा कापला जात आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
तसेच राहुल गांधी यांनी संविधानाच्या चर्चेच्या शेवटी बोलताना थेट केंद्र सरकारला चँलेज केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “इंडिया आघाडी म्हणून आमचा पुढचा निर्णय हा जातीय जणगणनेचा असणार आहेत. आम्ही जातीय जनगणना लागू करण्याचा कायदा आणणार आहोत. तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मोडणार आणि जातीय जणगणना आम्ही करूनच दाखवणार, तुम्हाला जे करायचे ते करा”, असा इशाराच यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला.