महाराष्ट्रराजकारण

महायुतीत कलगीतुरा : ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का?

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात ट्विट-ट्विट

मुंबई : विधानसभा निवडणुक जवळ येत असतानाच नेत्यामंडळीमध्ये चांगलेच वाक‌‌्युध्द सुरु झाले आहे. महायुती-महाआघाडीतील नेत्यामध्ये तर वाद-िववाद होतच असतात. पण आता महायुतीच्या मित्रपक्षामध्येसुध्दा चांगलेच विवाद होताना िदसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. याप्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आिण भाजप नेते जगदीश मुळीक यांच्यावरून िट्वटरवरून वाक‌्युध्द रंगले आहे.

या प्रकारानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्सवरुन ट्वीट करत, भाजपच्या कृत्याचा थेट जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला. अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा.आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकरींनी केली होती.

 

 

यावर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी ट्वीटला प्रत्युत्तर देत थेट मिटकरींवर हल्लाबोल चढवला आहे. जगदीश मुळीक ट्वीट करत म्हणाले, ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार ! अशा आशयाचे ट्वीट केले आहे. यावर आता अजितदादा गट आणि अमोल मिटकरी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button