महाराष्ट्र

मनोज जरांगे म्हणजे हिंदुत्व तोडायला निघालेला राक्षस : कालीचरण महाराज

छत्रपती संभाजीनगर : कालीचरण महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अशात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगेबद्दल नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे म्हणजे हिंदुत्व तोडायला निघालेला राक्षस, अशी टीका कालीचरण महाराजांनी केली आहे.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे इकडे एक आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाची खूप जोरदार हवा होती. मुंबईत तुफान गर्दी झाली होती. त्यांच्या नेत्याने दर्ग्यावर जाऊन चादर चढवली. जातीवरुन आरक्षण मागत होता. आरक्षण वगैरे नाही, त्याला हिंदुत्व तोडायचे होते. हिंदुत्व तोडायला निघालेला हा राक्षस आहे… असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.

तसेच दर पाच वर्षांनी निवडणूक होते आणि मतदानातून राजा ठरतो. राजा कसा असला पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे. मात्र भाजी आणि पेट्रोलच्या किंमतीसाठी मतदान करू नका. हिंदूंनो मोठ्या संख्येने धर्म वाचविण्यासाठी मतदान करा. तुम्ही लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण होणार, मुस्लिमांचे तळवे चाटणारा राजा होतो, असेदेखील कालीचरण महाराज म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जरांगे पाटील यांना राक्षस म्हणणाऱ्या कालीचरण यांचे वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे. कालीचरण यांची पाठीराखी महायुतीचा जाहीर निषेध! अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button