नाना पटोले यांना मातृशोक; मीराबाई पटोले यांचे वृद्धपकाळाने निधन

मुंबई : महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता भंडारा जिल्ह्यातील सोकाली या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पटोले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की नानाभाऊ पटोले आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी मीराबाई पटोले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.