‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माता मोदी अन् जेठालाल यांच्यात जोरदार तूतू-मैंमैं
मुंबई : लोकप्रियेचे सर्व विक्रम मोडणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा प्रसिद्ध शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी अनेक कलाकारासोबत शाेचे निर्माता अिसतकुमार मोदी यांचे भांडण झाले आहे. आता या कॉमेडी शोमध्ये जेठालाल चंपकलाल गडा यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यात अलीकडेच जोरदार भांडण झाले आहे. रजेवरून दोघांमध्ये वाद झाला आणि प्रकरण इतके टोकाला पोहोचले की शोच्या सेटवरच दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर पकडली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अनेकदा वादात सापडतो. मात्र यावेळी या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. न्यूज 18 च्या बातमीनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात ऑगस्ट महिन्यात हे भांडण झाले होती. सूत्राच्या हवाल्याने दिलीप जोशी हे असित मोदींकडे सुट्टी मागण्यासाठी गेले होते, मात्र असित मोदी त्यांच्याशी बोलणे टाळत होते. याचे दिलीप जोशी यांना वाईट वाटले आणि भांडण सुरू झाले.
सूत्राने रिपोर्टमध्ये सांगितले की, “कुश शाहच्या शूटिंगचा तो शेवटचा दिवस होता. दिलीप जोशी सुट्टीबद्दल बोलण्यासाठी असित मोदींची वाट पाहत होते. पण असित मोदी आल्यावर ते थेट कुशला भेटायला गेले. यामुळे दिलीप जोशी नाराज झाले.
सूत्राने सांगितले की, दिलीप जोशी खूप रागावले आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दिलीप जोशींनी असित मोदींची कॉलर पकडली आणि शो सोडण्याची धमकी दिली. मात्र, असित मोदींनी त्यांचा राग शांत केला. तेव्हा दोघांचा वाद कसा संपला हे आम्हाला माहित नाही.
रिपोर्टनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सेटवर दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. हाँगकाँग ट्रिप शूट दरम्यान असित आणि दिलीपमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी गुरुचरणसिंग सोधी याने दोघांमधील भांडण संपवले होते.