पत्नीचा विहीरात ढकलून खून
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील खिरमांनी येथे देविदास महादू भदाने याने पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई देविदास भदाने वय 35 वर्ष हिला विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान सायंकाळी विहिरीत मृतदेह दिसून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
महिलेचा मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नातवाईकांनी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यावरून माहेरच्या व सासरच्या मंडळी यांच्यात वाद सुरू होते. अखेर बारा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी पती देिवदास भदाने, सासरे महादू दगा भदाणे, दिर प्रवीण महादू भदाणे, दिर प्रवीण महादू भदाणे, दिराणी पूनम प्रवीण भदाणे, सासू सगुणाबाई महादू भदाने सर्व राहणार खिरमनी यांचेवर भांदवी कलम – 103(2),85,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मयत योगिता ह्यांचे पश्चात एक मुलगा व मुलगा असा परिवार आहे.
तणावपूर्ण परिस्थितीमुळे तेथे दंगल नियंत्रण पथक हजर होते. उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापूरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, संदीप चेडे आदींनी तात्काळ भेट दिली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.