माझी पत्नी ही सुंदर, मला ही तिला… : अदर पूनावाला

आठवड्यात 90 तास काम करण्याचा अन् बायकोकडे किती बघत बसणार असा सल्ला देणारे L&T चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांना सध्या सोशल मिडीयावर सर्वानी ट्रोल केले आहे. अिभनेत्री दिपीका पादुकोन पासून आनंद महिंद्रापर्यंत सर्वांनीच त्यांचा समाचार घेतला आहे. अशातच सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही मला माझ्या पत्नीकडे बघत बसणे आवडते, असे म्हणत यात उडी घेतली आहे.
L&T चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फेंसिंगद्वारे संवाद साधताना, कंपनीत 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. रविवारी कर्मचाऱ्यांनी काम केले तर मला जास्त आनंद मिळेल, ‘तुम्ही किती दिवस घरात तुमच्या बायकोकडे टक लावून पाहणार आहात, घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, असा सल्ला त्यांनी दिला होता. यावरून ते सध्या ते ट्रोल होत असून सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी एका मुलाखतीत, आनंद महिंद्रा यांनी तर, “माझी पत्नी खूप सुंदर आहे आणि मला तिच्याकडे पाहणं आवडतं,” असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज पूनावाला म्हणाले, “हो आनंद महिंद्रा, मी तुमच्या मताशी सहमत आहे, माझी पत्नी नताशा पूनावाला देखील मला खूप आवडते, तिला रविवारी माझ्याकडे पाहणं आवडतं.” तसंच “ कितीवेळ काम केलं याच्यापेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा असतो, मला माझ्या कामाच्या गुणवत्तेबद्दल विचारा, मी किती तास काम करतो याबद्दल नाही,” असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
कंपनीकडून समर्थन
90 तास काम करणे आणि पत्नीकडे पाहणे या वक्तव्यानंतर सर्वच क्षेत्रातून सुब्रमण्यन यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यानंतर त्यांच्या या टिप्पणीवर कंपनीकडून स्पष्टीकरणही जारी करण्यात आलं. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत. हे भारताचं दशक आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनण्याचे आमचे सामायिक दृष्टीकोन साकार करण्यासाठी सामूहिक समर्पणाची गरज आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात. जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
सुब्रह्मण्यन यांचा पगार कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट अधिक
L&T Chairman एस. एन. सुब्रह्मण्यन यांचे पॅकेज जबरदस्त आहे. कंपनीच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुब्रह्मण्यन यांचं वेतन 51 कोटी रुपये होतं. त्यांच्या वेतनात 43.11% टक्क्यांनी वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये कंपनीचे चेअरमन आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती तफावत आहे? ते ही सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारं सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये होतं. म्हणजे चेअरमनचं वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट अधिक आहे.