कल्याण अत्याचार अन् हत्या प्रकरणी नराधमास पत्नीसह अटक
मुंबई : कल्याण येथे अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी तिच्या आईकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. परंतु ती घरी परत आली नाही. त्यानंतर पीडित कुटुंबीयाने यासंदर्भात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी एकास बायकोसह अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या पत्नीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितले की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले.
त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली.
त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्का बसला. मात्र, नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले.
घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशाल याने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जेव्हा अल्पवयीन मुलीची डेड बॉडी वडिलांना दाखवण्यात आली वडिलांनी ही मुलगी त्यांचीच असल्याचे सांगितले. या अल्पवयीन मुलीची गडा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाले आहे की नाही या संदर्भातली माहिती मुलीच्या मृतदेहाच्या शोविच्छेदनानंतर समोर येईल.