नरेंद्र पवारने स्वतःचे ॲप तयार करून घातला कोट्यवधींचा गंडा, पोलीस अधिकाऱ्यांनी देखील गुंतविले पैसे
चार दिवसाची पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जिल्ह्यातील 1000 लोकांना सुमारे 150 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नरेंद्र पवार या नाशिकच्या भामट्याने पैसे गुंतवणुकीसाठी स्वतःचे ऍप तयार केले होते. प्राथमिक तपासामध्ये या ॲपचे नाव उशी असल्याचे समोर आले आहे. हे ॲप कुठे तयार झाले आणि यात गुंतवणुकीची काय पद्धत होती त्याचा तपास पोलीस करीत आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्यानंतर पवारच्या संपर्कात असलेले अनेक लोकांनी पोबारा केला. तर फसलेल्या अनेक लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामीण भागातील ज्या लोकांनी एजंटच्या साह्याने पैसे गुंतवले होते. त्यांनी एजन्सी घर गाठले. विशेष म्हणजे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी देखील यात पैसे गुंतवल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर अनेक माजी सैनिकांनी देखील यामध्ये पैसे गुंतवल्याचे समोर आले आहे. दरम्यान रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारदारांची संख्या वाढतेय
वर्तमानपत्रात बातमी छापून येताच अनेकांना आपण फसलो असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला तक्रारदारांची संख्या जास्त असल्यामुळे एक एफआयआर नोंदवून त्यात पुरवणी जबाब जोडण्यात येणार आहे. छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
आता पर्यंत हजारो लोक फसले तरी प्रकार सुरूच
दाम दुप्पटच्या आमिषाने शहरातील हजारो लोक आत्तापर्यंत फसले आहेत. मागील पाच वर्षात केबीसी मैत्रेय आभा इन्वेस्टर 20 30, सि.टी.ए याशिवाय हैदराबाद इथून आलेल्या एका कंपनीने देखील छत्रपती संभाजी नगरच्या नागरिकांना करोडो रुपयाचा गंडा घातला होता. मात्र कुठल्याच प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अशा अशा प्रकारच्या भामट्यांची हिम्मत वाढत गेली. अनेक प्रकरणांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ होऊन देखील आणि फिर्यादींना पैसे देखील मिळाले नसल्याचे समोर आले आहे.