सांगोला नगरपालिका ‘प्रशासक’ कालावधीतील विकास कामांच्या गुणवत्ता तपासणीची गरज
होऊ द्या, दूध का दूध ; पाणी का पाणी
सांगोला : प्रतिनिधी –
स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणूक नियोजित कालावधीपेक्षा लांबणीवर पडल्यामुळे सांगोला नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक शासनाकडून करण्यात आली आहे.
विकास कामे करताना असणारे सर्व अधिकार प्रशासकाकडे आहेत. सहाजिकच शहराच्या विकासाची गरज आणि दूरदृष्टी स्थानिक राजकीय लोकांपेक्षा जास्त असेलच असे नाही .
गेल्या दीड – दोन वर्षांपासून सांगोला नगरपालिका क्षेत्रात अनेक लहान – मोठी विकास कामे करण्यात आली तर काही कामे अजूनही सुरू आहेत, पंरतु याचं विकास कामाची गुणवत्ता व दर्जा खर्च केलेल्या ‘विकास निधी’ प्रमाणे आहे की नाही ? याची तपासणी गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
बांधकामांचा समावेश असणाऱ्या विकास कामांमुळे जरी शहराच्या वैभवात भर पडत असली तरी, अनेकवेळा अश्याच कामात ‘पाणी मुरण्याची’ शक्यता नाकारता येत नाही.
जेव्हा राजकीय आश्रय आणि आशीर्वाद मिळतो, तेव्हा तर बेलगामपणे कारभार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सांगोला शहरात प्रशासक कालावधीतील विकास कामांची गुणवत्ता व दर्जा तपासणी व्हावी आणि ‘दूध का दूध , पाणी का पाणी’ होऊ द्या, अशी मागणी होत आहे.
याप्रकरणी लवकरचं प्रहार संघटनेकडून वरिष्ठ अधिकारी व खात्याकडे लेखी निवेदन देऊन आंदोलन करणार असल्याचे समजते.