महाराष्ट्रराजकारण

काका अजित पवारांसाठी धावले पुतणे युगेंद्र

संजय राऊतांच्या गुलाबी सरडाला घेतला आक्षेप

मुंबई : महाविकास आघाडीच्या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांना गुलाबी सरडा असे नामकरण केले. यावर शरद पवार गटाचे नेते अन‌् अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आक्षेप घेतला आहे. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, अशी टीका करणं योग्य नाही असं युगेंद्र म्हणाले.

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाषण करताना संजय राऊतांनी महायुतीसह अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. गुलाबी जॅकेटमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सरडा म्हणून उल्लेख केला. याविषयी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, मी खाली बसलो होते. ते स्टेजवर बसले होते. ते काय बोलतील यावर आमचा कंट्रोल नाही. काही गोष्टीत ते बोलतील ते सगळच आम्हाला आवडते किंवा पटते असे नाही. कारण शेवटी कौटुंबिक संबंध देखील आहेत. राजकारण बाजूला ठेवले तर ते माझा काका आहे. त्यामुळे सगळेच जेव्हा त्यांच्यानर टीका करतात ती टीका मला आवडतेच असे नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

बारामतीमध्ये निवडणूक कोण लढणार हे ज्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा सुटेल त्यानंतर ठरेल. सध्या उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही . जय पवार सोबत अद्याप माझं बोलणं झालेला नाही मात्र तो निवडणूक लढणार असेल तर शुभेच्छा… एवढ्या दिवसांचा मतदार संघ त्यांना का सोडावा लागतोय याचे उत्तर तेच देऊ शकतात, असे युगेंद्र पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button