महाराष्ट्र

अक्षय शिंदेच्या दफनविधीस मिळेना जागा, विविध ठिकाणच्या स्थानिकांचा विरोध

मुंबई : बदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटले. पण अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली आहे. मात्र बदलापूरमध्ये अक्षय शिंदे याच्या दफनविधीस जोरदार विराेध दर्शविला आहे. त्यामुळे उल्हासनगरसह इतर ठिकाणी त्याचा दफनविधी करण्याचे ठरले होते. मात्र तेथील स्थानिकांनी त्यास नकार दिला. त्यामुळे अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी राज्य सरकारच्या ग्वाहीनुसार फक्त आजचाच दिवस उरला आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्यांच कार्यकत्यांचा समावेश आहे

अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी बदलापूर, उल्हासनगरसह विविध भागांमध्ये विरोध होत आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झालाय. गुरुवारी अक्षय शिंदे याचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी गेले होते. पण अंबरनाथ पालिकेने दफनविधीच्या परवानगीसाठीची त्यांचा अर्ज स्वीकारला नाही.

अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाकडून मृतदेहासाठी जागा पाहण्यास सांगितले. पण तरीही स्थानिक आणि राजकीय पक्षाकडून विरोध केला जात आहे.

उल्हासनगरमधील स्मशानभूमित अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली. प्रशासनाकडून खड्डाही खोदण्यात आला. पण याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध दर्शवण्यात आला. शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अक्षय शिंदे साठी खणलेला खड्डा बुजवला.

उल्हासनगरमध्येही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध झाला. बदलापूरमध्येही अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास विरोध कऱण्यात आला होता. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानात शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विरोध केला. पोलिसांनी खड्डा करण्यास सांगितले असले तरी आमचा त्या नराधमाला आणि पोलिसांनाही आम्ही विरोध करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. बदलापुरात तो राहायचा तर त्याचा मृतदेह बदलापुरात दफन केला जावा. उल्हासनगरच्या मातीत या नराधमाचा मृतदेह दफन करण्यास आमचा विरोध आहे, असे राजेंद्र चौधरी म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button