क्राइम स्टोरी

Crime Story : मला आणि माझ्या आईला का बोलतोस टोचून! जाब विचारत रोहीतने बाप उकड्याचा केला खून!

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील बारी गावातील ऊकड्या देवळ्या नाईक याच्या एकत्र कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमत नसल्याने, बोलण्या-चालण्यात, स्वभावात, आवडी-निवडीत भिन्नता असल्याने अशांतता बघायला मिळत होती. यातील कुटुंब प्रमुख होते ऊकड्या देवळ्या नाईक. त्यांच्या अधिपत्याखाली हे कुटुंब रहात असले तरी त्यांच्यामध्ये एकी नसल्याने त्या कुटुंबाची वाताहत झाली. ऊकड्या नाईक हा त्याची पत्नी देवलीबाई हिच्यासमवेत रहातो. त्यांच्यासोबत देवलीबाईच्या पहिला पतीचा मुलगा, तसेच परवीन ऊकड्या नाईक, हरिश ऊकड्या नाईक ही ऊकड्या नाईकची दोन मुलेही रहात होती. तसेच या दाम्पत्याला पूजा नामक मुलगीही आहे. तीसुद्धा त्यांच्यासोबत रहात होती. स्वतःच्या शेताबरोबरच इतरांच्या शेतात मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ऊकड्या नाईकचा सावत्र मुलगा रोहित हा मुळातच आडदांड, उद्धट आणि कामचुकार असल्याने त्याच्यासोबतकुणाचे पटत नव्हते. सावत्र मुलगा रोहित नोपाऱ्या नाईक याच्या वागण्याचा इतर मुलावर परिणाम झाल्याने तीही कामचुकारपणा करू लागली, त्यामुळे ऊकड्या नाईकची चीडचीड होत असे. ‘तुझ्यामुळे बाकी मुलेही कामचुकार झाली.’ असं ऊकड्या नाईक रोहितला टोचून बोलत असे.

गुरूवार दि. १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ऊकड्या देवळ्या नाईकला मनस्ताप देणारी घटना घडली, त्यामुळे ऊकड्या नाईक अस्वस्थ होता. त्याने सांगितलेल्या कामाकडे रोहितने दुर्लक्ष केल्याने ऊकड्या नाईकने आपला संताप आपल्या बायकोवर म्हणजे देवलीबाईवर काढला. त्याचा राग रोहितला आला. आपला राग आपला बाप आपल्या आईवर काढत असल्याचे पाहून रोहितने अपमानास्पद वक्तव्य आपल्या बापाला केल्यामुळे वाद वाढणार होता, पण देवलीबाईने मध्यस्थी करत आपल्या नवऱ्याचा रोष आपल्यावर ओढवून घेतला.

प्रत्येक वेळी आपली बायको निकम्मा व आडदांड मुलाची म्हणजे रोहितची बाजू घेवून त्याला प्रोत्साहित करते याचा राग ऊकड्याला आल्याने त्याने देवलीबाईला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या आणि तो संतापाने घराबाहेर पडला. आपल्यावरून आपला बाप नेहमी आपल्या आईचा उपमर्द व शिवीगाळ करतो, प्रसंगी मारठोक करतो म्हणून रोहितला बापाच्या आत्ताच्या वागण्याचा संताप आला. यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी रोहितने घरातील एक लाकडी दांडका घेतला आणि बापाला जन्माची अद्दल घडवतो असे म्हणत बापाच्या पाठोपाठ घराबाहेर पडला. आपल्या आडदांड मुलाचा संताप लक्षात येताच रोहितची आई देवलीबाईदेखील त्याच्यामागे धावत गेली.

घरातून संतापात बाहेर पडलेला ऊकड्या देवळ्या नाईक हा त्याचा नातेवाईक बोंबल्या नाईक याच्या घरापर्यंत पोहोचला होता. त्यांच दरम्यान त्याच्या, सावत्र मुलाने म्हणजे रोहित नोपऱ्या नाईक याने त्याला गाठले. ऊकड्या बेसावध असतांनाच त्याने आपल्या हातातील लाकडी दांडक्याने ऊकड्यावर चौफेर मारहाण करण्यास सुरूवात केली, तो मारहाण करत असतांनाच त्याच्या मागून निघालेली रोहितची आई देवलीबाई तिथे पोहोचली. तिने रोहितला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेल्या रोहितने आपल्या आईला देवलीबाईलाही बदडून काढले.

त्यादरम्यान त्या भागातून जाणाऱ्या सखाराम होगाया नाईक या ग्रामस्थाने मध्यस्थी करत रोहितला सावरले. अचानकरित्या झालेल्या मारहाणीने घायाळ झालेला ऊकड्या नाईक त्या परिसरातील एका बाकड्यावर झोपला होता. देवलीबाई आणि परवीन नाईक या मुलाने गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या ऊकड्यानाईकला घरी नेण्याचा प्रयत्न केला, पण ऊकड्याला चालताही येत नव्हते, तरीही तशा अवस्थेत त्याला घरी आणण्यात आले.

घरी आल्यावर न जेवताच ऊकड्या झोपी गेला. काही वेळातच तो उठला आणि शौचाला घराबाहेर गेला आणि काही वेळातच तो घरी आला. त्याला चक्कर येत होती. पोटात आणि छातीत जोरात कळा येत होत्या. त्याने आपणास उपचारार्थ सरकारी दवाखान्यात घेवून जाण्याची विनंती मुलांना आणि बायकोला केली.त्यावेळी ऊकड्या याला मारहाण करणाऱ्या सावत्र मुलाने म्हणजे रोहितने आणि सख्खा मुलगा परवीन यांनी गावातील दिलीप नानजा नाईक यांच्या जीपमधून नवापूर येथील ग्रामीण शासकीय रूग्णालयात नेले. प्रवासादरम्यान ऊकड्या नाईक याची प्रकृती गंभीर होवून तो बेशुद्ध झाला होता.

रूग्णालयात दाखल करतांना रोहित हा पुढे झाला आणि त्याने – तेथील डॉक्टरांना सांगितले की, आपले वडी ऊकड्या नाईक हे चालतांना त्यांना ठेच लागली आणि ते खाली पडले. त्यांना मार लागला असून ते बेशुद्ध झाले आहेत, अशी खोटी माहिती देत त्याने नवापूर येथील ग्रामीण शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांना तपासण्याची विनंती केली. नवापूर ग्रामीण शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनी बेशुद्ध अवस्थेतील ऊकड्या नाईकला तपासण्यासाठी टेबलावर घेतले, पण प्राथमिक तपासणीतच ऊकड्या नाईक मरण पावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तसे घोषीत केले.

आपला बाप मरण पावल्याचे समजताच रोहितने तात्काळ ऊकड्या नाईकचा मृतदेह घरी आणला. घरात ऊकड्याचा मृतदेहच आल्याचे पाहून देवलीबाई आणि इतरांनी हंबरडा फोडला. दरम्यान परवीन नाईक याने वावडी गावातील आपल्या काकाला आपल्या वडीलांचा मृत्यू झाला असून अंत्यसंस्कारासाठी येण्यास सांगितले. त्यावेळी त्या काकाने आपला भाऊ असा अचानकरित्या कसा मरण पावला ? असे विचारले असता परवीन ऊकड्या नाईक याने घडलेली घटना सांगितली. रोहित नोपऱ्या नाईक याने केलेल्या मारहाणीमुळे ऊकड्या नाईक याचा अंत झाल्याचे काकाला समजताच त्याने परवीनला कायदेशीर बाजू समजावून सांगितली.

काकाकडून कायदेशीर माहिती मिळताच परवीन याने गावचे पोलीस पाटील विजू पुण्या कोकणी यांना बोलावून वस्तुस्थिती सांगितली, तेंव्हा त्यांनी नवापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधत ऊकड्या देवळ्या नाईक याच्या खुनाची खबर दिली. खबर मिळताच नवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साळवे, उपनिरीक्षक विशाल सोनावणे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी आले.

घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साळवे यांनी पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता यांना घटनेची माहिती दिली. परिसरातील शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याच्या हेतूने आणि सदर प्रकरणाची कायद्याच्या चौकटीत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सुयोग्य सुचना – पोलीस अधीक्षक श्रावण दंत्ता यांनी नवापूर पोलिसांना दिल्या.

मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवल्यानंतर ऊकड्या नाईक याचा सख्खा मुलगा परवीन ऊकड्या नाईक याच्या फिर्यादीवरून नवापूर – पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला.पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनिरीक्षक विशाल सोनावणे यांच्यावर जबाबदारी सोपवली. रोहित नोपाऱ्या नाईक – याच्याविरोधात नवापूर पोलीस स्टेशनला खुनांचा गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे यांनी दि. १४ मे २०२४ रोजी सकाळी आठ वाजता रोहित नोपाऱ्या नाईक याला अटक केली आणि त्याला गजाआड केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button