क्राइम स्टोरी

Crime Story : चारित्र्याच्या संशयाने पती दिपक देई त्रास ! पल्लवीने नातलगांच्या मदतीने केले खल्लास !

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात वाघोरे हे एक छोटे गाव आहे. मूळचे या गावचे असणारे दिपक गोण्या सोनवणे हे ५४ वर्षाचे गृहस्थ कल्याण महानगरपालिकेत क्लार्क पदावर नोकरीवर आहेत. दिपक यांनी वयाची पन्नाशी पार केली होती. चांगली नोकरी होती. घर-दार होते. संसार बहरला होता, पण या सगळ्याला ग्रहण लागले होते ते दिपक सोनवणे यांच्या संशयी स्वभावामुळे. चारित्र्याचा संशय घेऊन ते नेहमीच पत्नी पल्लवी हिच्याशी वाद घालतअसत. तसेच ते तिच्यावर संशयदेखील घेत असत. आपल्या पत्नीचे कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला संतावत होता. त्या कारणावरून दिपक पत्नीला सतत शिवीगाळ व दमदाटी करून त्रास देत असत. या साऱ्या प्रकाराला पल्लवी कंटाळली होती. तिला हा त्रास सहन होईनासा झाला.

आपण हे सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्नच होता, त्यामुळे ती आपल्या त्रासाबद्दल बहीणीला सांगत असे. तिची बहीण तिची समजूत काढत असे. आज ना उद्या ते चांगले वागतील, तुला त्रास देणार नाहीत, असे तिची बहीण पल्लवीला सांगत असे, पण पल्लवीचा त्रास काही कमी झाला नव्हता. कोणी किती समजावले तरी दिपक ऐकत नव्हता. हा त्रास थांबवण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करत असतांना पल्लवी हिने टोकाचा निर्णय घेतला. तिने दिपकच्या हत्येचा कट रचला. यामध्ये तिने आपली बहीण, तिचा मुलगा आणि इतरांचा समावेश करून आपल्या पतीला ठार मारण्याचा कट रचला. यामध्ये तिच्या प्रियकराचाही समावेश असल्याची चर्चा आहे, मात्र त्याबद्दल पोलीस तपास सुरू आहे.

या कटामध्ये सहभागी असलेल्या काही लोकांनी सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी सायंकाळी दिपक सोनवणे यांना काहीतरी कारण सांगून एका ठिकाणी बोलावून घेतले. हे ठिकाण होते नाशिक जिल्ह्यातील जातेगाव (ता. नांदगाव) शिवारातील महादेव मंदिर. पत्नी तसेच अन्य नातेवाईकांनी बोलावले असल्याने दिपक सोनावणे हे महादेव मंदिराजवळ आले, तेंव्हा पत्नीसह जमलेल्या लोकांना पहाताच त्यांचा पारा चढला, कारण ते लोक वाद घालण्याच्या तयारीनेच आले आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. पहाता-पहाता वाद वाढत गेला. आलेले सर्व जण त्यांच्यावर तुटून पडले. त्यांना लाकडी काठीने जबर मारहाण करण्यात आली. याठिकाणी ते एकटेच असल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही. या मारहाणीत ते जखमी होवून खाली पडताच त्यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत अखेर दिपक जागीच मरण पावले. दिपक मरण पावल्याची खात्री होताच त्यांचा मृतदेह रस्त्याकडेला जंगलातीलझाडावर फेकून दिला. त्यांची स मोटरसायकलही त्याचठिकाणी घ टाकण्यात आली. जणू अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर ते सर्व जण पळून गेले.

दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती नांदगाव पोलीस ठाण्यात समजली. नांदगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जातेगाव शिवारातील असणाऱ्या महादेव मंदिराजवळील जंगलात एक मृतदेह मिळून आला होता. प्रथमदर्शनी त्याचा अपघात झाल्याचे दिसून येत होते, पण मृतदेहाच्या डोक्यावर व तोंडावर जखमा असल्यामुळे पोलिसांना घातपाताची शंकाही वाटत होती. घटनास्थळी आधार कार्ड आणि मोबाईल फोन मिळून आला, तसेच मोटरसायकलही मिळून आली. या साऱ्या वस्तूवरून पोलिसांनी मयताची ओळख पटवली. मयताचे नाव दिपक गोण्या सोनवणे (वय ५४, रा. वाघोरे, ता. अंमळनेर, जि. जळगाव) असल्याचे समजून आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

या तपासात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच सोनवणे कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी मयताची पत्नी पल्लवी हिच्याकडे कसून चौकशी केली. कुटुंबातील अन्य सदस्यांनाही एक-एक करत बोलावून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. प्रत्येकाने उलट-सुलट आणि वेगवेगळी उत्तरे दिल्याने पोलिसांना खात्री झाली. या खुनाच्या घटनेत मयताची पत्नी पल्लवी सोनवणे हिचा महत्त्वाचा रोल असल्याचे तपासात आढळून आले. दिपक सोनवणे हा पत्नीचे अनैतिक संबंध असावेत या संशयावरून तिला दमदाटी करत शिवीगाळ करायचा. दररोज होणाऱ्या वादाला ती कंटाळली होती. यातूनच तिने पतींचा काटा काढण्याचे ठरवले.

या कटामध्ये ती स्वतः, तिची बहीण, बहीणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) या सर्वांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे आणि लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंपरी हवेली, ता. नांदगाव) यांच्याशी संगनमत केले. कट रचून दिपक सोनवणे याचा खून केला अशी माहिती कबुली जबाबात मिळाली. यामध्ये सहा संशयित आरोपींचा समावेश असून पोलिसांनी आत्तापर्यंत चार आरोपींना गजाआड केले आहे.

यामध्ये मयताची पत्नी पल्लवी दिपक सोनावणे, संदीप (रमेश) महादू लोखंडे, साईनाथ बाबुलाल सोनवणे व लखन बाबुलाल सोनवणे यांचा समावेश आहे. तर मयताची मेहुणी, तिचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे यांचा तपास सुरू आहे. २४ तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावण्यात नांदगाव पोलिसांना यश आले.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी आणि सहकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केला. अवघ्या २४ तासाच्या आत तपास करून दिपक सोनवणे यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button