Crime Story : पत्नीसोबत नेहमीचा वाद, सुटत नव्हता दारुचा नाद; झिंगुबाईला ठार करुन धाकलु झाला कायमचा बाद

धुळे : सुखी संसाराची वाताहत करण्यासाठी दारूचे व्यसन पुरेसे ठरते. दारूच्या नाद माणसाची व त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या जीवलगाची वाताहत करण्यास कारणीभूत ठरतो. हे व्यसन तरूणपणीच लागते असे नाही तर जबाबदाऱ्यातून मुक्त झालेला प्रौढ माणूस चार चुटके घेऊ लागतो. पहाता-पहाता दारूच्या आहारी जातो आणि आयुष्यभर कमावलेले गमावून बसतो. धुळे जिल्ह्यात धाकलूच्या बाबतीतही तेच घडले, दोन मुली व एक मुलगा अशा तीनही अपत्यांचे विवाह झाले. मुले संसारात रमली होती. धाकलू आणि त्याची बायको गावी रहात होते. सगळे काही आनंदाने सुरू होते. या निवांत दिवसात धाकलू दारू पिऊ लागला. हे काही त्याच्या बायकोला मान्य होणारे नव्हते. याच कारणातून नवरा-बायकोमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसान अखेरीस तिच्या खुनात झाले. जिच्याबरोबर आयुष्यभर सुख-दुःखाचे क्षण जगला, तिलाच धाकलूने दारूसाठी ठार केलेआणि स्वतः तुरूंगात गेला.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील शेवगे परिसरातील धामंधर गावामध्ये धाकलू चुनीलाल गायकवाड आणि त्याची पत्नी झिंगुबाई धाकलू गायकवाड हे दाम्पत्य रहाते. झिंगुबाई हिचे माहेरचे नाव झिंगुबाई जयराम जगताप. तिचा विवाह साक्री तालुक्यातीलच शेवगे परिसरातील धामधंर गावातील धाकलू चुनीलाल गायकवाड याच्याशी अगदी धुमधडाक्यात झाला होता. धाकलू आणि झिगुबाई हे दोघेही कष्टाळू, काबाडकष्ट करून मिळणाऱ्या कमाईवर त्यांचा, संसार सुखाचा चालू होता. कालांतराने या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली. मुली वयात आल्यानंतर धाकलू आणि झिंगुबाई यांनी त्यांची लग्ने लावून दिली. दोघीही आपल्या संसारात सुखी आहेत. मुलींच्या लग्नानंतर मुलाचे लग्र झिगुबाईचा भाऊ चंद अवराम जगताप याच्या मुलीशी लावून दिले. पाकलूचा मुलगा आणि सून हे दोघे नाशिकला स्थायिक झाले होते. दोघांचा संसार सुखा-समाधानराने चालू होता. धाकलू-झिगुबाई यांच्या मुलींचेही संसार सुखा समाधानात चालू होते, धाकलूचा मुलगा नाशिकला स्थायिक झाल्याने अधून-मधून धाकलू आणि झिगुबाई आपल्या मुलाकडे रहायला जात, पण आपल्या गावी ते परतही येत. धाकलूचा मुलगा आणि सून हे दोघेही अधून-मधून आपल्या मूळगाव म्हणजे धाकलूझिणूबाई यांच्याकडे रहायला येत. काही दिवस राहिल्यानंतर नाशिकला परत येत असत. अशा त-हेने गायकवाड यांचा परिवार सुखा- समाधानाने रहात होता.
मात्र या परिवाराला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक? आता धाकलू हा दारू पिवू लागला होता, त्याचे त्याला व्यसनच लागले होते. झिगुबाईला ही गोष्ट मान्य नव्हती. ती त्या कारणावरून नवऱ्याशी भांडण करत असे, त्यामुळे दोघांमाये नेहमी भांडणे होवू लागली होती. एकमेकांना शिवीगाळ करणे, कधी-कधी धाकलू झिंगूबाईला मारहाणही करायचा. कारणपरत्वे ज्या-ज्यावेळी धाकलू आणि झिगुबाईमध्ये भांडणे व्हायची त्या-त्यावेळी झिंगुबाईचा भाऊ चंदू जगताप आणि इतर नातेवाईक झिंगुबाईच्या घरी येत असत. त्या दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आणि दोन दिवस राहून आपल्या घरी परतत असत. प्रसंगी झिंगुबाईच्या दोन्ही विवाहित मुली आणि नाशिकचा मुलगाही धार्मघर गावी येवून आई-वडीलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असत आणि बाताबरण शांत झालं की पुन्हा आपआपल्या घरी निघून जात असत. शेजारी पाजारी, निकटचे इतर नातेवाईक मित्र-मैत्रिणीही प्रसंगानुरूप होणाऱ्या भांडणात मध्यस्थी करून दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत, पण धाकलूच्या व्यसनामुळे आणि झिंगुबाईच्या तोंडाळ स्वभावामुळे त्यांच्यातील भांडणे काही थांबत नव्हती.
शुक्रवार दि. ५ जुलै २०२४ रोजी झिंगुबाईने जेवण केले आणि ती धाकलूच्या येण्याची वाट पाहू लागली. नवरा आला की दोघांनी मिळून जेवायचे असे तिने ठरवले होते, पण धाकलू लवकर यायचे काही नाव घेत नव्हता. त्याची वाट पाहून झिगुबाई वैतागली होती. अखेर तो घरी आला. त्याला उशीर झाला होता. आला तो डुलत- डुलतच. धाकलू दारू पिवूनच घरी आल्याचे दिसताच झिंगुबाईला राग आला, कारण आता तो जेवणार नाही हे तिला माहिती होते. आपण मेहनत घेवून केलेले जेवण वाया जाणार या कल्पनेनेच झिंगुबाईला राग आला.
अति मद्यसेवनाने धाकलूला बोलणेही जमत नव्हते, त्याला तोलही सावरता येत नव्हता. आल्या आल्याच त्याने शिवीगाळ सुरू केले. बोलायला येत नसले तरी तो झिंगुबाईच्या आई-वडीलांचा उद्धार करू लागला. हे ऐकून हिंगुबाईबा संताप आणखी वाढला. तिनेही धाकलूच्या माता-पित्यांचा अवमान करते, शिवीगाळ करत संताप केला. केवळ एवढ्याच कारणावरून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. वादाने परिसीमा गाठली. परिणामतः झिंगुबाईचा तोंडाळपणा धाकलूला सहन झाला नाही. त्याने झिंगुबाईला स्वयंपाकघरात ओढत नेले आणि लोखंडी विळीने झिंगुबाईच्या सर्वांगावर जबरदस्त मारहाण केली.ही मारहाण झिंगुबाईला सहन होत नव्हती. ती ओरडत होती, पण त्यांच्या घरात हे नेहमीचेच चालत असल्याने शेजाऱ्या-पाजा-यांनीही दुर्लक्ष केले. आत्तापर्यंत धाकलू विळीने झिगुबाईला मारत होता आणि अचानक त्याच्या हाताला टॉर्च लागला. तो टॉर्च घेवून त्याने त्याचा टोला झिंगुबाईच्या डोक्यात ओहाणला. त्या टोल्याने झिंगुबाईच्या डोक्यावर भली मोठी जखम झाली आणि त्यातून भळाभळा रक्त येवू लागले. थोड्याच वेळात अतिरक्तस्त्रावाने झिगुबाई भोवळ येवून जमिनीवर येवून पडली झिगुबाईचा वाचाळपणा बंद झाल्याने धाकलूसुद्धा शांत झाला. तो मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे आपल्या हातून काय घडले? याची त्याला जाणीवच नव्हती. तो तशाच अवस्थेत झोपी गेला.
सकाळी धाकलूला जाग आली, तेंव्हा त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या झिंगूबाईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठत नव्हती. ते पाहून धाकलू घाबरून गेला. त्याला काय करावं हे सुचेनासं झालं. त्याने घाबरून शिंगूबाईच्या अंगावरचे रक्ताळलेले कपडे काढले आणि तिच्या शरीरावर दुसरे कपडे घातले.
दरम्यान परिसरात या घटनेची माहिती समजली आणि लोक धाकलूच्या घरी जमू लागले. धाकलूचा पुतण्या गोट्या जेजीराम गायकवाड याने झिगुबाईच्या भावाला चंदू जगताप यांना मोबाईलवरून निधनाची माहिती दिली आणि त्यांना ताबडतोब धामंधरला येण्यास सांगितले. बहीणीच्या कोणा नातेवाईकाचा मृत्यू झाला असावा असा कयास बांधून चंदू हे आपले चुलत भाऊ दिपक साहेबराव जगताप, मधुकर जम्या जगताप, गुलाब महारू ठाकरे हे सर्व जण खाजगी वाहनाने धार्मधरला आले. गावात आल्यानंतरच त्यांना समजले की आपल्या बहीणीचा झिगुबाईचा मृत्यू झाला आहे. धावत-पळतच ते सर्व ते सर्व जण धाकलूच्या घरात शिरले. घरी जावून पहातो तो काय झिंगुबाई ही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती.
दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाची आणि झिगुबाईच्या मृतदेहाची पहाणी करून पंचनामे केले. झिगुबाईच्या डोक्याला व कानाखाली मारहाणीच्या जखमा होत्या. त्यातून रक्त वाहुन गेले होते.
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पिंपळनेर पोलिसांना सुयोग्य मार्गदर्शन करून कायद्याच्या चौकटीत पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पिंपळनेर येथील ग्रामीण शासकीय रूग्णालयात दाखल केला. त्यासाठी धार्मधर गावातील अनिल मुरलीधर ठाकरे यांच्या बोलेरो नामक बाहनाचा उपयोग झाला. पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम झाल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. झिंगुबाईचा भाऊ चंदू जयराम जगताप यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये आपला मेहुणा धाकलू चुनीलाल गायकवाड याच्याविरूद्ध खुनाची फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीच्या आधारे पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाकलू चुनीलाल गायकवाड याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.