Crime Story : आर्थिक की अनैतिक संबंधाचा होता वाद! विजयने साथीदारांसह केले प्रशांतला बाद!
नाशिक : अलिकडे कोणाला जीवाची पर्वा उरली नसल्याचे भयानक चित्र दिसू लागले आहे. वयाची तिशी पार करण्याआधीच तरूण जीव देण्यास आणि जीव घेण्यास सरसावू लागले आहेत. किरकोळ कारणातून निर्माण झालेला वाद सामोपचाराने मिटवण्यापेक्षा एखाद्याचा जीव घेऊनच वाद संपवण्याचा अविचार अनेक तरूण करू लागले आहेत. परिणामी क्षुद्धक कारणातून मित्राचा खून करून मित्रच गजाआड होण्याचे प्रमाण वाढत आहे. नाशिक शहरातही दोन मित्रांमध्ये किरकोळ बाद होता, वादातून एकाने इतर मित्रांच्या मदतीने मित्राचाच काटा काढला. एक मित्र ठार झाला तर त्याला मारणारे चीधे तुरूंगात गेले. या घटनेचा हा वृत्तांत.
नाशिक शहरातील पंचवटी भागात असणाच्या रामवाडी येथील आदर्शनगरात प्रशांत अशोक तोडकर नावाचा २८ वर्षाचा तरूण आपल्या कुटुंबीयांसमवेत रहातो. तो रिक्षाचालक आहे. त्याची स्वतः ची रिक्षा नाही. परिसरातील एका इसमाची रिक्षा तो भाड्याने घेऊन चालवतो. कष्टाळू असलेला प्रशांत दिवसभर सीबीएस ते पंचवटी – म्हसरुळ मार्गावर प्रवासी वाहतूक करतो. शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी प्रशांत हा दिवसभर घरातच होता. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान तो रिक्षा घेवून घराबाहेर पडला. रात्री उशीरा का होईना तो घरी येईल असे त्याच्या घरच्यांना वाटले होते, पण तो रात्री घरी परतलाच नाही.
दुसरा दिवस उजाडला. रात्री प्रशांत घरी न परत आल्याने घरचे लोक चिंतेत होते. पण आपला मुलगा कळता आहे येईल परत असे समजून घरचेही आपापल्या कामाला लागले. दरम्यान थोड्याच वेळात प्रशांतचा भाऊ योगेश तोडकर याला म्हसरूळ पोलिसांचा फोन आला. त्यांनी योगेशला सांगितले की शहरातील मेरी रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स जवळील पटांगणात एका रिक्षा चालकाचा मृतदेह सापडला असून अमुक अमुक नंबरची रिक्षा तिथे उभी आहे. आपला भाऊ चालवत असलेली रिक्षा त्या ठिकाणी आहे आणि एक मृतदेह देखील त्या ठिकाणी आहे हे समजल्यावर योगेशच्या काळजाचा ठोका चुकला. काल संध्याकाळी रिक्षा घेऊन गेलेला आपला भाऊ अजूनही परतला न आल्याने त्याला शंका आली की हा मृतदेह आपल्या भावाचा तर नसेल ना? या विचाराने तो पटकन घटनास्थळी गेला.
घटनास्थळी पडलेला मृतदेह त्याचा भाऊ प्रशांत तोडकर याचाच होता. त्याचा दगडांनी ठेचून खून केल्याचे दिसून येत होते. त्याची अवस्था पाहून योगेश तोडकरला रडूच कोसळले. रडत रडतच त्याने हा आपला भाऊ प्रशांत तोडकर असल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्या भावाचा का आणि कोणी खून केला असेल याबद्दल मात्र त्याला कोणतीच कल्पना नव्हती. घटनास्थळाजवळ दारूच्या बाटल्या, ग्लास आणि रक्ताने माखलेले दगड मिळून आले होते. दारू पार्टीच्या वेळी काहीतरी वाद होऊन त्या तरुणाचा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता.
मृतकाची ओळख पटली होती. आता त्याला मारणा-यांचा तपास करणे बाकी होते. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भात योगेश तोडकर यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात कारणाने अज्ञात लोकांनी प्रशांतचा खून केला अशा आशयाची ही फिर्याद होती. गुन्हा नोंद झाल्यावर म्हसरूळ पोलीस ठाणे तपास कामी लागले. सर्वप्रथम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू झाला. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस व गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करू लागले. सी.सी. टी.व्ही. फुटेज, तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार त्यांनी घेतला, शिवाय प्रशांत याच्याशी कोणाचा वाद व भानगड झाली होती का? याची माहिती पोलिसांनी मिळवली.
या माहितीमध्ये असे समजून आले की, विजय आहेर आणि प्रशांत तोडकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. प्रशांत तोडकर हा विजय आहेर यांच्या भावाची रिक्षा भाड्याने चालवत होता. त्या संदर्भातील आर्थिक वादही त्यांच्यामध्ये होते. शनिवार दि. 15 जून रोजी विजय आहेर याने पार्टी करण्याचा बेत आखला. त्याने आपले मित्र संकेत प्रदीप गोसावी रा. जुईनगर, म्हसरूळ, पंचवटी, नाशिक, प्रशांत निंबा हादगे रा. पेठ रोड, मेहरधाम, पंचवटी, नाशिक व कुणाल कैलास पन्हाळे रा. मायको, दवाखान्याच्या पाठीमागे, दिंडोरी रोड, पंचवटी यांना त्याने आपल्यासोबत घेतले. या सर्वांनी मिळून प्रशांत तोडकर याला मेरी रासबिहारी लॉन्सरोडवरील पटांगणावर दारूच्या पार्टीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास बोलावून घेतले.
दारूची पार्टी सुरू झाली. यावेळी प्रशांत तोडकर यास आग्रह करून भरपूर दारू पाजली गेली. त्यानंतर विजय याने प्रशांतबरोबर वाद घालायला सुरूवात केली. वाद वाढू लागला. दोघे जण एकमेकांशी वाद घालत एकमेकांना शिवीगाळ करू लागले. अखेर ते मारामारीपर्यंत पोहोचले. प्रशांत यास दारू जास्तच चढली होती. त्याला प्रतिकार करता येत नव्हता. या भांडणात प्रशांतला खाली पाडण्यात आले आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्याचे डोके ठेचले जावून रक्तबंबाळ होवून प्रशांत ठार झाल्याचे पाहून चौघांनी तेथून पळ काढला.
हे सर्व मारेकरी रिक्षाचालक असून ते प्रशांत याचे मित्रच होते. दारूची पार्टी करायची आहे असे म्हणत या चौघांनी प्रशांतला बोलावून घेवून त्याचा खून केला. विजय याने झालेल्या वादाचा असा बदला घेतला होता. प्रशांतचा खून केल्यानंतर चौघे संशयित प्रथम कल्याणला गेले. त्यानंतर पिंपरी- चिंचवडी भागात पळून गेले. पोलिसांनी या खुनाचा तपास करतांना सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि तांत्रिक बाबीची मदत घेतली. हे हल्लेखार फरार असल्याने त्यांनी तांत्रिक बाबीचा कौशल्याने वापर करून त्यांचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांना हे सर्व संशयित पिंपरी-चिंचवड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधून युनिट २ च्या पथकाला तशी खबर दिली. नाशिकमधून गुन्हे शाखा युनिट १ चे पथकही पिंपरी-चिंचवडला रवाना करण्यात आले. दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करत चौघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांना नाशिक येथे आणल्यावर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
विजय दत्तात्रय आहेर रा. रामवाडी, पंचवटी, नाशिक, संकेत प्रदीप गोसावी रा. जुईनगर, म्हसरूळ, पंचवटी, नाशिक, प्रशांत निंबा हादगे रा. पेठ रोड, मेहरधाम, पंचवटी, नाशिक व कुणाल कैलास पन्हाळे रा. मायको, दवाखान्याच्या पाठीमागे, दिंडोरी रोड, पंचवटी या चौघा रिक्षाचालक मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना रितसर अटक केली.
आर्थिक व इतर कारणावरून विजय आहेर याचा प्रशांत तोडकर याच्याशी वाद झाला होता. याच कारणावरून त्याने प्रशांतचा काटा काढल्याचे समजते, पण परिसरात मात्र वेगळीच चर्चा ऐकावयास मिळते. आर्थिक वादाबरोबरच प्रशांतचा खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाल्याचे बोलले जात आहे. सखोल तपासात तशी माहिती समोर येवू शकेल अशी चर्चा ऐकावयास मिळते.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रविंद्र बागुल, हवालदार विशाल काठे, प्रविण वाघमारे, नाझिमखान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, विलास चारोसकर, जगेश्वर बोरसे, उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी 24 तासांमध्ये गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले.