पूजा खेडकरचे वडीलांचा ’बाप तो बाप रहेगा’ आणि ‘मै हु डॅान’ गाण्यावर डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

झोलझाल करून आयएएस बनलेल्या अन् प्रशिक्षणाथ्ी असतानाच अनेक मागण्या करणाऱ्या बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर ही तिचे वडील दिलीप खेडकर यांच्या डान्समुळे पुन्हा चर्चेत आली.
‘बाप तो बाप रहेगा’ गाण्यावंर पुजा खेडकर यांच्या वडिलांचा डान्स pic.twitter.com/Yz6bxaTLqM
— bharat jadhav (@bharatjadhav891) September 23, 2024
गणेशोत्सवात पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ’बाप तो बाप रहेगा’ आणि ‘मै हु डॅान’ गाण्यावंर डान्स केला. पाच दिवसांच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत दिलीप खेडेकर यांनी डान्स केला होता. त्यांच्या या डान्साचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आहिल्याबाईनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या भालगाव हे खेडेकर याचं गाव आहे. दरम्यान दिलीप, मनोरमा आणि पुजा खेडकर यांच्यावर गुन्हे दाखल, तसेच पुजा खेडकर यांच्या जामिनावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. पुजा खेडकरला केंद्रीय कार्मिक मंत्रालय आणि युपीएससी बडतर्फ केले आहे. दिलीप खेडकर यांचा डान्सचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.