तामिळनाडू : तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या पोस्टरवर पॉर्न स्टार मिया खलीफाच्या फोटोमुळे नवा वाद उफाळून आला आहे. पॉर्न स्टारचा फोटो एखाद्या धार्मिक ठिकाणी दिसल्यावर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. धार्मिक पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो वापरल्यावर नवीन वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या एका कार्यक्रमाच्या पोस्टरवर या पॉर्न स्टारचा फोटो दिसला. आता हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
तामिळनाडूमधील कांचीपुरमजवळील कुरुविमलाई या गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. त्या गावातील मपिल्लई विनयागर मंदिरात नागथम्मन आणि चेल्लीअम्मनची मंदिरे आहेत. या मंदिरात आदिवेली अम्मान उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या मंदिरात 9 ऑगस्ट रोजी माँ अम्मान म्हणजेच पार्वती मातेचा ओटीभरण सोहळा होणार आहे.
या सोहळ्यासाठी भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यातील एका पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो दिसल्याने लोकांना धक्काच बसला. त्या पोस्टरवर मिया खलिफा डोक्यावर कलश दिसत असून तिने पिवळा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.