क्राइममहाराष्ट्र

पोर्श अपघात : निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणारेे अधिकारी बडतर्फ

पुणे : दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन कारचालकाला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांना सरकारने बडतर्फ केले आहे. कल्याणीनगर येथील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकाला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्या त्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवून या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. राज्य सरकारने या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथे 18 मेच्या मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव चालवून दोन तरुणांना धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने साडेत सात हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करुन सोडलं होतं. तसंच, तीनशे शब्दांचा निबंध आणि आरटीओत जावून वाहतूक नियमांचा अभ्यास करावा, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला इतकी सौम्य शिक्षा सुनावल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. हे प्रकरणही तापलं होतं.

महिला व बाल विकास आयुक्तालयाने त्याची गंभीर दखल घेऊन बाल न्याय मंडळाच्या त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस जारी केली होती. तसं, चौकशीसाठी समितीही स्थापन केली होती. अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळातील एका सदस्याने भूमिका मांडली होती. ती भूमिका न्याय मंडळासमोर ठेल्यानंतर दुसऱ्या सदस्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एक सदस्य दोषी नाही, तर दुसरा सदस्यही दोषी आहे, असं आढळलं होतं. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

न्याय मंडळाच्या एल एन धनवडे आणि कविता थोरात दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य नियुक्त सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button