महाराष्ट्र

सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यविधीला थांबणार प्रकाश आंबेडकर

परभणी : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मत्यू झाला. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याच्या आरोप होत आहे. शवविच्छेदनानंतरचा मृत्यूचे कारण सांगणारा प्राथमिक अहवालही समोर आल्यानंतर सोमनाथचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरमधून परभणीत आणला जात आहे.

परभणीत मृतदेह आणून अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार असल्याचं वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पोलिसांच्या कारवाईवर संशय घेत त्यांनी परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं वक्तव्य केलंय. पोलिसांनी केलेली कारवाई ही समजून होती का हेही कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. तसेच बीड मधील परिस्थिती स्टंट असून हा स्टंट भीतीदायक असल्याचंही ते म्हणाले.

परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज’ असे देण्यात आले आहे. यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता असून परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, परभणीत पोलिसांनी जे ॲक्शन घेतली ती कोऑर्डिनेटेड होती की नव्हती हे कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. इथले IG जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. याचा तपास आम्ही करणारच असेही ते म्हणाले.

फॉरेन्सिक विभाग असेल तिथेच उत्तरीय तपासणी करावी: प्रकाश आंबेडकर
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यूप्रकरणी उत्तरीय तपासणी ही फॉरेनसिक विभाग असेल तर तिथेच करावी अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आलेल्या सर्व विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मल्टिपल इंजुरीज असल्याने मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. शासनाला मी सांगतोय अपघाती व्यक्तींच्या मृतदेहाचे सिटीस्कॅन करावे. असेही आंबेडकर म्हणाले. मृतदेह परभणीत येतोय अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार. शांततेत हे सगळं पार पडलं पाहिजे. असंही ते म्हणाले.

कॉम्बिंग ऑपरेशनच्या काही तासात पोलिसांकडून जी घरे फोडण्यात आली त्यावर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास लाठी चार्ज केला गेला तो पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कोणी केला हे शोधणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ज्यांना ज्यांना मारले आहे त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सर्व वकिलांना सूचनाही त्यांनी दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button