मनोरंजन

मै झुकेगा नही म्हणणारा पुष्पा लेकीसमोर झुकला, बदलला आपला लुक

पुष्पा भाग १ ब्लॉकबॅस्टर झाल्यानंतर लगेच ‘पुष्पा 2: द रुल’ची शुटींग साऊथ स्टार अल्लू अर्जुनने केली होती. त्यामुळे गेली पाच वर्षे तो पुष्पा लुकमध्ये होता. आता या यशानंतर अल्लू अर्जुनने आपला लुक बदलला आहे. त्यामागे त्याची मुलगी असल्याचा खुलासाही अिभनेत्याने केला आहे. मुलगी अरहा ही त्याच्या दाढीमुळे त्याच्यापासून दूर राहायची. झुके का नही म्हणणारा पुष्पा आपल्या लेकीसमोर झुकला, अन् त्याने दाढी कमी केली.

साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट नुकताच ब्लॉकबस्टर ठरला आहे. ताज्या अहवालांनुसार, अभिनेता त्याच्या पात्रासाठी जवळजवळ पाच वर्षे समर्पित केल्यानंतर चित्रपटात नवीन रूप सादर करणार आहे. चित्रपटाच्या यशानंतर त्याने आपली लांब दाढी आणि केस कापले आहेत. आणि आता अभिनेता त्याच्या खऱ्या लुक मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याचा हा लुक पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता लवकरच आगामी सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे.

नव्या रुपावर लवकरच पडदा उचलला जाणार आहे
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अल्लू अर्जुन लवकरच त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर करणार आहे. ‘पुष्पा 2’ मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलचे त्याचे समर्पण स्पष्ट होते कारण त्याने संपूर्ण चित्रपटात आपली लांब दाढी आणि केस ठेवून केले होते. अलीकडेच अल्लू अर्जुनने खुलासा केला होता की, त्याची मुलगी अरहा त्याच्या दाढीमुळे त्याच्यापासून दूर राहायची. आता अभिनेत्याने त्याची दाढी आणि केस कापले आहेत.

अभिनेता दोन दिग्दर्शकांसोबत काम करू शकतो
सध्या अल्लू अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटांची योजना आखत आहे. तो संदीप रेड्डी वंगा आणि आणखी एका त्रिविक्रम श्रीनिवासच्या चित्रपटात दिसू शकतो. ‘पुष्पा’मध्ये इतका वेळ घालवल्यानंतर आगामी काळात दरवर्षी अनेक प्रकल्पांवर काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता लवकरच नव्या लुकसह नव्या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसेच या चित्रपटाचे नाव अद्यापही समोर आलेले नाही.

पुष्पा 2 अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 1163.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट भारतातील 1200 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. तसेच, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच या चित्रपटामधील सगळी गाणी आणि कलाकार प्रेक्षकांना खूप आवडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button