महाराष्ट्रराजकारण

छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या लोकांकडून पैसांचा पाऊस : इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर : मतदारांना आपल्याला मत देण्यासाठी आकर्षित करण्यासाठी भाजप आणि महायुतीकडून मतदारांना पैसा वाटण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. पैसे वाटतांनाचा व्हिडीओ देखील इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत दाखवला आहे. अनेक ठिकाणी महिलांचे आधार कार्ड घेऊन त्यांना पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतांसाठी पैसे वाटतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. मी व्हिडीओ दाखवला, त्यातील लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्यांच्यासाठी काम करतात, असा आरोपही जलील यांनी केलाय.

इम्तियाज जलिल म्हणाले, दलित समाजातील स्वयंघोषित नेते 500 रुपये वाटून संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला मदत करत आहेत. यावेळी जलील यांनी अरविंद डोंगरगावकर हे भाजपच्या एका सेलचे नेते आहेत. त्यांचं ऑफिस जवाहर नगर पोलीस ठाण्यासमोर आहे. त्याठिकाणी मुस्लिम महिलांना रिक्षातून आणण्यात आलं. तिथं एका मतासाठी 1 हजार रुपये आणि जास्त लढत होते, त्यांना दोन हजार रुपये वाटण्यात आले.

अतुल सावे व त्यांच्या गुंडांवर कठोर कारवाई करावी
पुढे बोलताना इम्जियाज जलिल म्हणाले, लोकांना मतदानाला जाता येऊ नये म्हणून थांबण्यात आलं. अतुल सावेंकडून पैसे येणार आहेत. औरंगाबादमधील आंबेडकर नगर या झोपडपट्टीत पैसे वाटपासाठी आलेल्या नेत्याला महिलांनी 500 रुपये घेण्यासाठी घेराव घातला. हे सर्व भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सुरु होतं. हे फक्त एका क्षेत्रातील व्हिज्युअल आहेत. अजून काय पुरावे हवेत. या मतदारसंघातील निवडणूक अन्यायकारक झाली आहे. अतुल सावे व त्यांच्या गुंडांवर कठोर कारवाई करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button