देश-विदेशभारत

राम मंदिराची तारीख ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी करावी, तेच भारताचे ‘खरे स्वातंत्र्य’ : माेहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी, अयोध्येत राम मंदिर बांधण्याची तारीख ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरी करावी कारण याच दिवशी भारताचे ‘खरे स्वातंत्र्य’ स्थापित झाले होते. यासाठी, अनेक शतके ‘पराचक्र’ (शत्रूंच्या हल्ल्यांना) तोंड द्यावे लागले.” असे म्हणत मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हिंदू कॅलेंडरनुसार, प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला ११ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. याविषयी बोलताना मोहन भागवत यांनी, “राम मंदिर आंदोलन कोणाच्याही विरोधासाठी सुरू झालेले नाही” असेही म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी, “भारताच्या ‘स्व’ला जागृत करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे जेणेकरून देश स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल आणि जगाला मार्ग दाखवू शकेल.” असे त्यांनी म्हटले.

इंदूर येथे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना ‘राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार’ प्रदान करण्यात आला . यावेळी आयोजित या समारंभात मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी, “गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामादरम्यान देशात कोणताही कलह नव्हता.” असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर चंपत राय म्हणाले की, मी हा सन्मान अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात मदत करणाऱ्या राम मंदिर चळवळीतील सर्व ज्ञात-अज्ञात लोकांना समर्पित करतो. चळवळीतील संघर्षाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करताना, चंपत राय म्हणाले की मंदिर हे ‘भारताच्या मिशांचे’ प्रतीक आहे आणि ते फक्त त्याच्या बांधकामाचे माध्यम आहेत.

अहिल्या पुरस्कार म्हणजे काय? ‘राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार’ दरवर्षी इंदूरस्थित सामाजिक संघटना ‘श्री अहिल्याोत्सव समिती’ कडून विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. या संघटनेच्या अध्यक्षा माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त सुमित्रा महाजन म्हणाल्या की, इंदूरच्या माजी होळकर राजघराण्याच्या प्रख्यात शासक देवी अहिल्याबाई यांना समर्पित एक भव्य स्मारक शहरात बांधले जाईल, जेणेकरून लोकांना त्यांच्या जीवनचरित्राची ओळख होईल.

गेल्या काही वर्षांत, राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार नानाजी देशमुख, विजया राजे सिंधिया, रघुनाथ अनंत माशेलकर आणि सुधा मूर्ती यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button