विमानतळावर इमीग्रेशन सुविधेसाठी भरती प्रक्रिया सूरू – पोलीस आयुक्त

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने इमिग्रेशनची सुविधेसाठी कर्मचारी देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात आलेले असून छाननी आणि नियमानुसार सर्व प्रक्रिया बारकाईने पूर्ण करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावू अशी माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.
चिकलठाणा विमानतळावरून एअर एशिया या विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर ते बँकांक अशी नियमित विमान सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. ही सेवा देण्यासाठी इमिग्रेशनची सुविधा आवश्यक आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातुन कर्मचारी नियुक्ती करण्याबाबत गृह विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे. या अंतर्गत कर्मचारी भरतीसाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या अर्जाची छाननी केली जाईल. तसेच इमिग्रेशन कामासाठी आवश्यक नियमांची पुर्तता केली जाणार आहे. सध्या पोलिस विभागाकडे पोलिस भरतीसह कारागृह कर्मचारी भरती शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेची कामे आहेत. सदरील कामे संभाळून सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशी माहितीही प्रविण पवार यांनी दिली.