महिलेवर बलात्कारानंतर वारंवार धमकावून शारीरिक संबंध

छत्रपती संभाजीनगर : जेवणाचा डब्बा देण्यासाठी एकच्या घरी गेल्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून तिला धमकावून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. ही घटना फेब्रुवारी ते २६ जुलै दरम्यान आमेर नगर, सातारा परिसर आणि गोदावरी लॉन्स येथे घडली. शाहरुख शेख (रा. आमेर नगर, बजाज हॉस्पिटलच्या मागे) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी महिला ही मेसचा डब्बा देण्यासाठी आरोपी शाहरुख याच्या घरी गेली होती. तेव्हा त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तिचे फोटो काढून घेतले. मी सांगेल तेव्हा मला भेटायचं नाहीतर तुझे फोटो फेसबुकवर व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच तिच्या मुलांना किडनॅप करेल असे देखील धमकावले. त्यानंतर मे २०२४ मध्ये एका हॉटेलवर शाहरुख याने महिलेला बोलावून घेतले. तिथे देखील तिच्यावर बलात्कार केला. २६ जुलै रोजी शाहरुख याने महिलेला फोन करून बोलावून घेतले. त्याचा ब्लॉक केलेला नंबर काढ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.