क्राइममहाराष्ट्र

लॉरेन्स बिष्णोई गँगचा सामना करण्यासाठी सलमान खानने दुबईहून मागितली….

मुंबई : बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिष्णोई गँगकडून काही दिवसांपूर्वीच मुंबईत हत्या करण्यात आली. तसेच अभिनेता सलमान खान ही या टोळीच्या निशाण्यावर अाहे.

या गँगकडून सलमानला धमकीचा मेसेज आल्यामुळं पोलिसांसह सलमान खानची खासगी संरक्षण यंत्रणाही सतर्क झाली आहे. त्यामुळे सलमाननं स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला. सलमानचा हा निर्णय म्हणजे, बुलेटप्रूफ कार खरेदी करण्याचा. सूत्रांच्या माहितीनुसार भाईजाननं एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली असून, दुबईहून ही कार आणण्यात आली आहे. या कारमध्ये असणारे खास फिचर पाहता त्यामुळंच तिची किंमतही तितकीच तगडी आहे हे नाकारता येत नाही.

सलमाननं निसानची पेट्रोल स्पोर्ट एसयुव्ही खरेदी केली असून, ही एक बुलेटप्रूफ कार आहे. यामध्ये वॉर्निंग अलर्ट, जवळून किंवा दुरून होणाऱ्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठीची संरक्षक काच, प्रवाशांची ओळख गुलदस्त्यात ठेवणारे टिंटेड विंडो कव्हर असे फिचर आहेत. या कारची किंमत 2 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

भारतात उपलब्ध नसल्यामुळं सलमाननं ही कार दुबईहून आयात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही त्याच्याकडील दुसरी बुलेटप्रूफ कार ठरत आहे. यापूर्वी त्यानं टोयोटाची बुलेटप्रूफ लँड क्रूजर LC200 खरेदी केली होती. या दोन्ही कारव्यतिरिक्त बी टाऊनच्या या अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी ए8 एल (13 कोटी रुपये), बीएमडब्ल्यू एक्स6 (1.15 कोटी रुपये), टोयोटा लँड क्रूजर (1.94 कोटी रुपये), ऑडी आरएस7 (1.4 कोटी रुपये), रेंज रोवर (2.6 कोटी रुपये), ऑडी आर8 (2.31 कोटी रुपये) आणि लेक्सस एलएक्स470 (2.32 कोटी रुपये) या आलिशान कारही आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button