भारतमनोरंजन

लैंगिक अत्याचारांवरील हेमा समितीच्या अहवालावर समांथाचं मोठं विधान, म्हणाली ‘तेलुगू इंडस्ट्रीत….’

हेमा समितीचा अहवालामध्ये चित्रपटसृष्टीत मिळणारा दुजाभाव, अत्याचार, लैंगिक छळ यावर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. तेलुगू चित्रपसृष्टीतील लैंगिक अत्याचारावरही तेलंगणा सरकारने असाच अहवाल सादर करावा अशी मागणी अभिनेत्री समांथा प्रभूने केली आहे. यामुळे महिलांना सुरक्षित वातावरणात काम करण्यास तसंच योजना आखण्यास मदत होईल असं तिने सांगितलं आहे.

“तेलुगु चित्रपटसृष्टीतील आम्ही महिला हेमा समितीच्या अहवालाचं स्वागत करतो. आणि केरळमधील WCC च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं कौतुक करतो, ज्याने या क्षणापर्यंत मार्ग काढला आहे,” असं समांथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली आहे की, “आम्ही याद्वारे तेलंगणा सरकारला लैंगिक छळावर सादर केलेला उपसमितीचा अहवाल प्रकाशित करण्याची विनंती करतो, ज्यामुळे TFI (तेलुगु चित्रपट उद्योग) मध्ये महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण तयार करण्यासंबंधी योजना आखण्यास आणि धोरणं तयार करण्यात सरकार आणि इंडस्ट्रीला मदत होईल”. न्यायमूर्ती हेमा समितीच्या 235 पानांच्या अहवालात, साक्षीदार आणि आरोपींची नावे बदलून प्रकाशित करण्यात आली आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीवर 10-15 पुरुष निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचं नियंत्रण आहे असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये तीन सदस्यीय न्यायमूर्ती हेमा समितीची स्थापना केली होती आणि 2019 मध्ये अहवाल सादर केला होता. हा अहवाल जारी करण्यात आलेल्या कायदेशीर आव्हानांमुळे आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता. जर तेलंगणा सरकारने केरळप्रमाणे समिती स्थापन केली तर टॉलिवूडला फायदा होईल असं समांथाचं मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button