महाराष्ट्र
सांगोला शहर व तालुक्यातील गणेशोत्सवाची शांततेत सांगता
तादाद कम है, लेकिन काम मे दम है; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सांगोला : प्रतिनिधी
तालुक्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता पोलीस प्रशासनाचे संख्याबळ कमी असतानाही ‘तादाद कम है, लेकिन काम मे दम है ‘ याप्रमाणे सांगोला पोलीसांनी नियोजनबद्ध आणि कार्यकुशलता पूर्वक केलेल्या नियोजनामुळे शहर व तालुक्यातील गणेशोत्सवाची सांगता शांततेत झाली.
सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करून मंगळवारी गणेशविसर्जन असल्याने सर्वत्र आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्याची लगबग दिसून येत होती. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य मिरवणूक काढून धुमधडाक्यात श्रीगणरायला ‘पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत निरोप दिला.
पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीसांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवून व गर्दीच्या ठिकाणी दस्त ठेवून कौतुकास्पद कामगिरी पार पडली. शहरात रात्री उशिरापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनातून पोलीसांची गस्त सुरू होती. तसेच गणेशोत्सव कालावधीत सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहंमद (स.) यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यात विविध कार्यक्रम व जुलूस पार शांततेत पडले, यावेळीही सांगोला पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी पार पाडली, त्यामुळे सांगोला पोलीसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
लोकांचे सहकार्य- पोलीस कर्मचाऱ्यांचे मेहनतसांगोला शहर व तालुक्यातील गणेशोत्सव व ईद- ए-मिलाद हे दोन्ही सण अत्यंत उत्साहात साजरे झाले. सर्व गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे तसेच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, आमच्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याने आनंदाच्या ‘दुधात मिठाचा खडा’ पडला नाही.– पो.नि. भीमराया खणदाळे (सांगोला पोलीस ठाणे)