दिल्ली : राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका गांधी यांनी वायनाड येथून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली. यात त्या प्रचंड मतांनी प्रियांका गांधी विजयी झाल्या. प्रियांका गांधी यांनी हातात संविधान घेऊन शपथ घेतलीये. प्रियांका गांधी यांनी घातलेल्या साडीची यावेळी जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. प्रियांका यांनी लोकसभेच्या सदस्याची शपथ ही हिंदीमधून घेतली. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि संविधानाचे जे मूल्य आहे, त्याला मजुबती देण्याचं काम होईल, अशी पहिली प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी शपथ घेतल्यानंतर दिली आहे.
विशेष म्हणजे प्रियांका गांधी यांनी हातामध्ये संविधान घेऊन शपथ घेतली. भाऊ राहुल गांधी यांना यावेळी नमस्कार करतानाही प्रियांका गांधी या दिसल्या. दरम्यान, शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शेरणी संसद मे आ गयी… असे म्हणत प्रियंका गांधींचं स्वागत केलं आहे.
शेरनी संसद आ गयी! https://t.co/Jd9qQHyF86
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2024
यासोबतच नांदेडमधून लोकसभेची पोटनिवडणुक रवींद्र चव्हाण यांनी लढवली, ते देखील निवडून आले. त्यांनीही लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीमधून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी देखील हातामध्ये संविधानाची प्रत घेतली होती. रवींद्र चव्हाण यांनी पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रियांका गांधी यांना 6.22 लाख मते मिळाली.
लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड मतदारसंघात काॅंग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांनी झेंडा फडकावला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. यानंतर नांदेडमध्ये पोटनिवडणुक झाली. काॅंग्रेसकडून वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवले गेले. रवींद्र चव्हाण यांनी संतुकराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला. भाजपाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला.
अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेल्याने नांदेडचा गड परत काॅंग्रेसला राखता येईल का?, याची जोरदार चर्चा होती. नांदेडकरांनी काॅंग्रेसची साथ दिली. भाजपाचा उमेदवार नांदेडमध्ये निवडून येऊ शकला नसल्याने अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उरतली. विशेष म्हणजे भोकर मतदारसंघातून भाजपाकडून ती उभी राहिली आणि तिचा विजयही झाला. आता अशोक चव्हाण यांच्या लेकीची राजकिय प्रवास सुरू झाला आहे.