क्राइममहाराष्ट्र

बंद पडलेल्या एस. टी. बसमधील डिझेलवर चोरट्यांचा ‘डल्ला’

उदनवाडी ता. सांगोला नजीक राष्ट्रीय महामार्गावरील घटना

सांगोला : प्रतिनिधी
 रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उदनवाडी ता. सांगोला नजीक बंद पडलेल्या कोल्हापूर – सोलापूर एस. टी. बसच्या डिझेल टाकीमधील सुमारे ११ हजार २८० रुपये किंमतीचे १२० लिटर डिझेल व २ हजार रुपये किंमतीचे ब्रेक ड्रम अज्ञात चोरट्यानी चोरून नेहला असल्याची घटना घडली आहे.
 याप्रकरणी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी एस.टी. बस चालक उत्तम गायसमुद्रे रा. ताराबाई पार्क, एस.टी. कॉलनी, कोल्हापुर यांनी सांगोला पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चालक हे बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ३४७१ कोल्हापुर येथून सोलापुरकडे घेऊन निघाले होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सदर बस सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे आली असता, बसच्या पाठीमागील व्हील जॅम झाल्यामुळे बस बंद पडली.
  सदर बसतील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवून पाठवून दिले. बसच्या पाठीमागील व्हील जॅम झाल्याचे बसडेपो, कोल्हापुर येथे फिर्यादी चालक यांनी कळविले असता, त्यांनी सांगोला बस डेपोला कळविण्यास सांगितले. त्यानंतर सांगोला बस डेपोला कळविल्यावर त्यांनी दोन मेकॅनिक बस दुरुस्तीसाठी पाठविले.
 दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजेपर्यंत बस दुरुस्तीचे काम सुरू होते, परंतु बस दुरुस्त न झाल्याने फिर्यादी चालक व सांगोला डेपोकडील दोन मेकॅनिक व्हि. एच. फुले व ए. डी. पंडीत असे बसमध्ये झोपी गेले.
 सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे झोपेतून उठले आणि बसच्या पाठीमागे गेले असता, एस. टी. बसच्या डिझेल टाकीमधील डिझेल पडलेले दिसले. फिर्यादी यांनी डिझेल टाकीजवळ जावून बघितले, तेव्हा डिझेल टाकी खाली असल्याचे दिसून आले. तसेच ब्रेक ड्रम दिसून आला नाही, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button