भारतमहाराष्ट्र

सुभेदार प्रमोदसिंह होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोपरगाव : माता की जय, वीर जवान तू अमर रहे, वंदे मातरम अशा घोषणा देत मंगळवारी सायंकाळी 6 वाजता कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सुभेदार प्रमोदसिंह रावसाहेब होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक आर. पी. होन यांचे ते सुपुत्र होत. ते सैन्य दलात कार्यरत होते. चांदेकसारे पंचक्रोशीतून प्रमोदसिंह होन यांना अखेरचा निरोप देताना हजारोचे डोळे पाणावले.

पुणे इथून सुभेदार होन यांचे पार्थिव सैन्यदलातील जवानांच्या टीमने सायंकाळी पाच वाजता चांदेकसारे येथे आणले. होन यांना शेवटचा निरोप देताना गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीत शासकीय इतमात त्यांना मानवंदना देण्यात आली. कोपरगावचे नायब तहसीलदार व महसूल विभागाची टीम, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्य दलातील एका तुकडीने तीन रांऊड फायर करत त्यांनी सलामी दिली. सुभेदार होन यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button