महाराष्ट्रराजकारण

प्रतिभा काकूंना नातवाचा एवढा का पुळका आला, यावर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना ठणकावले

बारामती : प्रतिभा पवार या निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत:ला दूरच ठेवतात. मात्र, या िनवडणुकीत त्या नातू युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसत आहे. शरद पवार यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रतिभा पवार करायच्या. मात्र यंदा राष्ट्रवादीत यावर अजित पवारांनी भाष्य केलंय. काय नातवाचा पुळका आलाय कळेना. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे. आता वेळ नाही विचारण्याची. त्यांना विचारणार आहे की प्रचाराचा एवढा का पुळका आला होता?, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “माझी आई कुठलीही भावनिक आव्हान करत नाही. आई लोकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंतचे सगळ्यांचे तिचे ऋणानुबंध संबंध आहेत’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “एक लक्षात ठेवा मुलं हे दूध असतं आणि नातवंड हे दुधावरची साय असतात. आजीला दुधावरची साईच मुलापेक्षा नातवावर प्रेम असतं. आमचं कुटुंब जॉईंटच आहे. पण रेवती प्रिय आहे.

माझं देखील तसंच आहे. मी घरी आले की सुप्रिया घरी आले पण रेवती घरी आली की अरे रेवती घरी आली. कुठल्याही आजोबांना आपल्या मुलापेक्षा नातवंडच प्रिय असतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button