क्राइममहाराष्ट्र
विद्यार्थींनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षकास अटक

बुलढाणा, विष्णु आखरे पाटील
बुलडाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील 3 विद्यार्थिनींना नराधम शिक्षकाच्या लैंगिक छळाला सामोरे जावं लागलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवरुन शिक्षक खुशाल उगले विरोधात विनयभंग, लैंगिक छळ,पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकरी किनगाव राजा पोलिसात पोहोचले व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीने कठोर शासन करण्याची मागणी केली. शिक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी दिली आहे.