देश-विदेश

गौतम अदाणी यांच्यावरील आरोपावरून राजकीय वातावरण तापले

नवी दिल्ली : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणूकीप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे आणि अब्जाधीश रुपये गोळा करणे याप्रकरणी आरोप झाल्याने अदानी समूहाला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेत गौतम अदानीसह 7 जणांवर 2 अब्ज डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे.

या प्रकरणानंतर विरोधकांनी देखील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आहे. राहुल गांधी यांनी गौतम अदानींना आजच अटक करा अशी केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही, धारावी प्रकल्प प्रकरणात अदानींनी हस्तक्षेप केला आहे. टेंडरमध्येही अनियमितता आहे. यामुळे गौतम अदानींमुळे आता संपूर्ण भारताची बदनामी होत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी काय म्हणाले ?
राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकन एजन्सीने त्यांना रंगेहाथ पकडले आहे, मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांना आजच अटक करावी. नरेंद्र मोदीजींनी नारा दिला होता की ‘एक है तो सेफ है.’ भारतात अदानी आणि मोदी एक आहेत आणि ते सुरक्षित आहेत. भारतात अदानीजींना कोणीही काहीही करू शकत नाही.” तसेच माधुरी बुच यांना हटवून त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील राहुल गांधी यांनी केली आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “एक मुख्यमंत्री 10-15 कोटी रुपयांच्या आरोपाखाली तुरुंगात जातो पण अदानी 2 हजार रुपयांचा घोटाळा करतात. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान त्यांचे संरक्षण करतात. पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत आहेत आणि ते स्वतः भ्रष्टाचारात गुंतले आहेत. अदानींवर अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे, त्यांनी 2 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. पण भारतात अदानींना कोणीही काही करू शकत नाही. अदानींना अटक झाली पाहिजे. ”

पुढे राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा निधी हा अदाणींकडून येतो. पंतप्रधानांनी अदानींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला असून देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात,” असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपावर केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
256 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याप्रकरणी ट्रम्प सरकारने अटक वॉरंट जारी केले आहे. धारावी प्रकल्प प्रकरणात अदानींनी हस्तक्षेप केला आहे. टेंडरमध्येही अनियमितता आहे. यामुळे गौतम अदानींमुळे आता संपूर्ण भारताची बदनामी होत आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी अदानींनी 2000 कोटी रुपये खर्च केले, असा धक्कादायक आरोपदेखील संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button